ट्रॅफिक दादा-सिग्नल दादा | रस्ते सुरक्षा-2 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव: ट्रॅफिक दादा-सिग्नल दादा
पूर्वनियोजित कृती :
• सर्वप्रथम शिक्षक कृतियुक्त ट्रॅफिक दादा-सिग्नल दादा यावर आधारित कृतियुक्त कविता गायन करतात.
• विद्यार्थ्यांकडून ट्रॅफिक दादा-सिग्नल दादा यावर कृतियुक्त गायन करून घेतात.
विद्यार्थीदेखील वाहतुकीचे सगळे नियम समजून घेतात.
कविता -
ट्रॅफिक दादा सांगा, सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा.
छोट्यांचा ऐकून एकच गलका, ट्रॅफिक दादा म्हणाले 'ऐका'
दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा.
खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा.
हिरवा दिवा लागेल तेव्हा, गाडी तुमची पुढे चालवा.
लावाल वाहन 'नो पार्किंगला' होईल दंड नक्कीच तुम्हाला.
खूप धूर वाहन सोडता, दुरुस्ती करा वेळ न लावता.
पाळा नियम वाहतुकीचे संकट ना येई. 'ट्रॅफिक जॅम' चे
वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण,
ट्रैफिक दादा सांगा, सांगा, तुमची भाषा आम्हाला सांगा.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- वाहतुकीच्या नियमांचे पालन, कृतियुक्त गायन, मनोरंजनातून शिक्षण. आवश्यक साहित्य : साऊंड सिस्टीम, माईक, वेशभूषा साहित्य, वाहतुकीच्या नियमांचे फलक, लाल, पिवळा व हिरवा दिवादर्शक फलक.
शिक्षक कृती :
१) सर्वप्रथम शिक्षक कृतियुक्त ट्रॅफिक दादा-सिग्नल दादा यावर आधारित कृतियुक्त कविता गायन करतात.
२) विद्याथ्यांकडून ट्रॅफिक दादा-सिग्नल दादा यावर कृतियुक्त गायन करून घेतात.
३) लाल, पिवळा, हिरवा दिवा यांचे वाहतुकीमधील महत्त्व समजवतात.
४) वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी सांगतात, तसेच वाहतुकीच्या नियमांचे प्रात्यक्षिक करून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विदयार्थी कृतियुक्त ट्रॅफिक दादा-सिग्नल दादा यावर आधारित कृतियुक्त कविता गायन करतात.
२) विदयार्थी ट्रॅफिक दादा यावर कृतियुक्त गायन करतात.
३) विद्यार्थी लाल, पिवळा, हिरवा दिवा यांचे वाहतुकीमधील महत्त्व समजून घेतात तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करतात.
४) विद्यार्थी शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे वाहतुकीच्या नियमांच्या प्रात्यक्षिकाचा सराव करतात.
संदर्भ साहित्य :
१) संदर्भीय दूरदर्शन व्हिडिओ. https://youtu.be/U7BPQZOtAYE