नकाशावरील माझे स्थान | व्यक्तिमत्त्व विकास-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : नकाशावरील माझे स्थान
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांना आपण कोठे राहतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतात. पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे छापील मजकुरासह A4 कागद तयार करतात.
जसे :
स्वतःचे नाव :
वडिलांचे नाव :
घराचा पत्ता :
घर क्रमांक :
रस्ता
वार्ड क्र. :
गाव/शहर :
ता. :
जि.
राज्य :
देश :
पिन कोड:
पत्ता लिहिण्यासाठी लागणारी माहिती जसे गाव/शहर, जिल्हा, राज्य, देश याबद्दल माहिती देतात. विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती निरीक्षण, संभाषण, बौद्धिक विकास, तंत्रज्ञान कौशल्ये
आवश्यक साहित्य : पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे छापील मजकुरासह A4 कागद (प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र). तालुक्याचा, जिल्ह्याचा नकाशा (शाळेनुसार), महाराष्ट्र राज्याचा व भारत देशाचा नकाशा, पृथ्वीगोल, मोबाईल किंवा संगणकावर Map App असलेला (Mapples/ Google).
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना पत्ता कसा लिहावा हे समजावून सांगतात. पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे छापील मजकुरासह A4 कागद प्रत्येक विद्यार्थ्याला देतात.
जसे :
स्वतःचे नाव :
वडिलांचे नाव :
घरचा पत्ता
घर क्रमांक
रस्ता
वार्ड क्र. :
गाव/शहर :
ता. :
जि.
राज्य :
देश :
पिन कोड :
२) शिक्षक विद्यार्थ्यांना आपले गाव/शहर नकाशावर शोधण्यास सांगतात.
३) शिक्षक मोबाइल किंवा संगणकावर नकाशा दाखविणारा अॅप ओपन करून त्यावर शाळेचा पत्ता शोधून शाळेचे स्थान जिल्ह्यात, राज्यात व देशात (Zoom in, Zoom out) करून दाखवितात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी दिलेल्या कागदानुसार छापील मजकुरावर आपल्या गाव/शहराचे स्थान आपला पूर्ण पत्ता
लिहितात. जसे :
स्वतःचे नाव :
वडिलांचे नाव :
घराचा पत्ता
घर क्रमांक :
रस्ता :
वार्ड क्र. :
गाव/शहर :
ता. :
जि. :
राज्य :
देश :
पिन कोड :
(टीप : विद्यार्थी पत्ता लिहिलेला कागद स्वतः संचिकेमध्ये लावतात.)
२) विद्यार्थी नकाशाचे निरीक्षण करून आपल्या गावाचे स्थान तालुका, जिल्हा, राज्य व देश या नकाशांमध्ये शोधून दाखवितात.
३) विद्यार्थी घरी जाऊन मोठ्यांच्या मदतीने नकाशा अॅपवर आपल्या घराचे स्थान शोधतात.
४) आपले गाव/शहर यांची इतिहास गुणवैशिष्ट्ये यांच्या नोंदी देखील करतात.
संदर्भ साहित्य : https://youtu.be/AjA98JZt7E0?si=4zwkiOK3qL-wvZil
पूरक कृती :
Map Tricks
Map Reading
Types of Maps