वृद्धाश्रम भेट | क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : वृद्धाश्रम भेट
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक परिसरातील वृद्धाश्रमाचे ठिकाणे, नावे, अंतर इ. बाबत माहिती गोळा करतात.
• शिक्षक परिसरात उपलब्ध वृद्धाश्रमांपैकी कुठे व केव्हा भेट दयायची याचे नियोजन करतात. संबंधित व्यक्तींना व पालकांना याची पूर्वकल्पना देतात.
आवश्यकता असल्यास वाहनाची व्यवस्था करतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन होण्यासाठी सूचना देतात. विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची सूचना देतात. उदा. पाणी बॉटल ठेवणे, रांगेत चालणे, वृद्ध व्यक्तींना आदराने व आपुलकीने बोलणे इ. सूचना
शिक्षक विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी दरम्यान कोणत्या बाबींची माहिती घ्यावी किंवा निरीक्षण करावे याबाबत सविस्तर पूर्वसूचना देतात.
उदा. १) वृद्धाश्रमाचे नाव काय आहे?
२) वृद्धाश्रम कोठे आहे?
३) वृद्धाश्रमाला भेट देण्याची वेळ काय आहे?
४) वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीची संख्या किती आहे ?
५) वृद्धाश्रमात कोणकोणत्या सोई सुविधा दिल्या जातात ?
६) वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्ती येण्याचे कारणे काय आहेत?
७) वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय केले जाते?
८) वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीचे वाढदिवस साजरे केले जातात का?
९) वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींना गप्पागोष्टी केल्यानंतर तुम्हाला कसे वाटले?
१०) वृद्धाश्रम असावेत का? यावर तुमचे मत सांगा.
११) वृद्ध व्यक्तींना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण काय करायला हवे ?
१२) वृद्धाश्रमाला भेट देऊन तुम्हांला कसे वाटले, काय अनुभव आले इत्यादी.
क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारे (प्रश्नोत्तरे, गप्पागोष्टी) चर्चा करणार हे ठरवतात. प्रश्न निश्चित करतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना अहवाल / प्रकल्प लेखनासाठी मुद्दे देतात. जसे कि, क्षेत्रभेटीचे ठिकाण, दिनांक, वार, वेळ, क्षेत्रभेटीचा हेतू, साहित्य, मिळालेली माहिती, समारोप याप्रमाणे विद्यार्थ्यांशी चर्चा करून अहवाल लेखन करून घेतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती निरीक्षण, संप्रेषण, सहकार्य, आदर आवश्यक साहित्य पाण्याची बाटली, डबा इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील वृद्धाश्रमाची माहिती सांगतात.
२) परिसरातील वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्तीसंदर्भात सूचना देतात. (उदा. एका रांगेत चला, स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा, वृद्ध व्यक्तींना आदराने व आपुलकीने बोलणे)
३) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्रभेटीवेळी पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात.
४) क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून चर्चा करतात.
उदा. १) वृद्धाश्रमाचे नाव काय होते?
२) वृद्धाश्रम कोठे होते ?
३) वृद्धाश्रमाला भेट देण्याची वेळ काय होती?
४) वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तींची संख्या किती होती?
५) वृद्धाश्रमात कोणकोणत्या सोईसुविधा दिल्या जातात ?
६) वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्ती येण्याची कारणे काय होती?
७) वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय केले जाते?
८) वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जातात का?
९) वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींना गप्पागोष्टी केल्यानंतर तुम्हाला कसे वाटले?
१०) वृद्धाश्रम असावेत का? यावर तुमचे मत सांगा.
११) वृद्ध व्यक्तींना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण काय करायला हवे ?
१२) वृद्धाश्रमाला भेट देऊन तुम्हांला कसे वाटले, काय अनुभव आले इत्यादी.
५) शिक्षक क्षेत्रभेटीदरम्यान विदयार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात, मदत करतात.
६) विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभव, मिळालेली माहिती याचे संकलन करण्यास सांगतात.
७) विदयार्थ्यांकडून पूर्वनियोजनानुसार क्षेत्रभेटीचे अहवाल / प्रकल्प लेखन करून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी परिसरातील भेट दिलेले ठिकाण / स्थळ याचे नाव सांगतात.
२) विद्यार्थी क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात.
३) विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या स्थळाची माहिती सादर करतात.
४) विद्यार्थी क्षेत्रभेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.
५) विद्यार्थी क्षेत्रभेटीच्या ठिकाणी शक्य असल्यास आवश्यक ते फोटो घेतात. प्रश्न/शंका विचारतात.
६) विदयार्थी पूर्वनियोजनानुसार क्षेत्रभेटीचे अहवाल / प्रकल्प लेखन करतात.
• अशा प्रकारे लघुउद्योग, बंधारा, नदीचा उगम/नदी, ऐतिहासिक वास्तू किंवा स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध ठिकाणे/स्थळे इ. ना क्षेत्रभेट देता येईल.