विद्यार्थी शालेय वस्तुभांडार | वित्तीय व्यवस्थापन/आर्थिक साक्षरता-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : विद्यार्थी शालेय वस्तुभांडार
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करतात.
विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध शालेय साहित्य घाऊक बाजारातून आणून शाळेत विक्रीसाठी उपलब्ध करतात.
वस्तूंचे दर निश्चित करून शाळेतील विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देतात.
विद्यार्थ्यांना नोंदवहीमध्ये खरेदी-विक्री व्यवहार लिहिण्यासाठी मार्गदर्शन करतात.
विकसित होणारी कौशल्ये- व्यवहारज्ञान कौशल्य, आर्थिक व्यवहार कौशल्य.
आवश्यक साहित्य : पेन, पेन्सिल, रबर, पट्टी, प्रोजेक्ट कागद, प्रोजेक्ट चित्रे, वही, तेलखडू, रिफील.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करतात.
२) वेगवेगळ्या गटांकडे वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी ठेवतात.
३) प्रत्येक गटाला आपली स्वतंत्र नोंदवही ठेवण्यास सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शाळेच्या या उपक्रमामध्ये सहभागी होतात.
२) खरेदी-विक्री व्यवहार समजून घेतात.
३) नफा-तोटा या संदर्भाने आर्थिक व्यवहारविषयक ज्ञान आत्मसात करतात.
संदर्भ साहित्य : https://youtu.be/xokl0VoMDJU?si=pcEUmD0x3zgO9sGr