दोन्ही हातांनी लिहू स्वतःचे नाव | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-1.2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१) कृती व खेळांवर आधारित शिक्षण
उपक्रमाचे नाव : दोन्ही हातांनी लिहू स्वतःचे नाव
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतात. शिक्षक जी कृती करत आहेत त्याचे सूक्ष्म निरीक्षण करायला सांगतात.
२) शिक्षक दोन्ही हातांमध्ये दोन खडू घेतात आणि फळ्यावर एकाच वेळेस दोन्ही हातांनी स्वतःचे नाव लिहून
दाखवतात.
३) मुलांना सूचना देऊन वहीवर एकाच वेळी दोन्ही हातांचा वापर करून, स्वतःचे नाव लिहायला सांगतात विद्यार्थ्यांकडून पुन्हा पुन्हा सराव करून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण करतात. दोन्ही हातांमध्ये दोन पेन घेऊन एकाच वेळी दोन्ही हातांनी स्वतःचे नाव लिहिण्याचा सराव करतात.
२) हा सराव पाच ते सात वेळा केल्यानंतर, समोर येऊन फळ्यावर दोन्ही हातांनी स्वतःचे नाव लिहून दाखवतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtube.com/shorts/naXHZqvKyFw?si=UD6bvokUxgqSHM1k