महा ई सेवा केंद्रास क्षेत्रभेट | लोकसेवा हक्क अधिनियम-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : महा ई सेवा केंद्रास क्षेत्रभेट
उद्देश : विविध कागदपत्रे काढण्यासाठीची कार्यपद्धती माहिती होणे.
पूर्वनियोजित कृती :
शासकीय कार्यालयांच्या कामकाजाच्या दिवशी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यासाठी शासकीय सुट्ट्यांची माहिती घेतात.
महा-ई सेवा केंद्रातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना क्षेत्रभेटीची पूर्वसूचना देतात.
शिक्षक महा-ई सेवा केंद्राविषयी माहिती गोळा करतात.
> आधारकार्ड केंद्र
> महा-ई सेवा केंद्र
विद्यार्थ्यांना महा-ई सेवा याविषयी पायाभूत माहिती सांगतात.
क्षेत्रभेटीच्या दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन करतात.
• विद्यार्थ्यांना सुचवलेल्या प्रश्नांची तपासणी करून प्रश्नांचे अंतिमीकरण करतात.
विकसित होणारी कौशल्ये प्रश्ननिर्मिती, संवाद कौशल्य, माहिती संकलन
आवश्यक साधनसामग्री आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमेलियर, वाहन लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्राचे नमुने.
शिक्षक कृती :
शिक्षक वरील दाखल्यांची माहिती मिळवण्यासाठी जवळच्या महा ई सेवा केंद्रास भेटीचे नियोजन करतात.
१) विद्यार्थ्यांचे ५५ किंवा १० १० याप्रमाणे गट करतात.
२) महा-ई सेवा केंद्र या ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसह आयोजित करतात.
३) विद्यार्थ्यांना माहिती घेत असताना आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करतात.
विद्यार्थी कृती :
१) क्षेत्रभेटीच्या दरम्यान विचारावयाचे प्रश्न शिक्षकांना तोंडी सांगतात.
जसे वरील दाखले काढण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ?
• वरील दाखले काढण्यासाठी कोठे जावे लागते ?
वरील दाखले किती वर्षासाठी वैध असते?
२) महा-ई सेवा केंद्र या ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमध्ये सहभागी होतात.
३) विविध दाखले/प्रमाणपत्रांना अनुसरुन संबंधिताना प्रश्न विचारतात.
४) मिळालेल्या माहितीवर आधारित सहध्यायी व शिक्षक यांच्यासोबत चर्चा करतात.
संदर्भ साहित्य : १) प्रश्नावली २) पेन्सिल ३) पेन ४) कोरे कागद