कुटुंबातील व्यक्तींची मुलाखत | क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती-3 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव: कुटुंबातील व्यक्तींची मुलाखत (आजी-आजोबा, आई-बाबा, ताई दादा, काका-काकू, मामा-मामी)
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांशी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबाबत चर्चा करतात.
पालकसभेत शिक्षक पालकांना या बाबतीत पूर्वकल्पना देतात.
• शिक्षक विदयार्थ्यांना कुटुंबातील प्रिय/आवडणारी यशस्वी व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी निवड करण्यास सांगतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना मुलाखत कशी घ्यावी याबाबत सविस्तर सूचना देतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना मुलाखत घेताना खालील प्रकारचे प्रश्न विचारण्यास सांगतात.
प्रश्न :
१) तुमचे नाव काय आहे?
२) तुमची जन्मतारीख काय आहे?
३) तुमचे वय किती आहे?
४) लहानपणी तुमचा आवडता खेळ कोणता होता.
५) तुमच्या लहानपणी काय काय खाऊ मिळायचा?
६) लहानपणी तुम्हाला शाळेला जायला आवडत होते का? तुमचे आवडते शिक्षक कोण होते?
मुलाखतीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यासाठी प्रश्न ठरवतात.
विकसित होणारी कौशल्ये- निरीक्षण, संप्रेषण, अभिव्यक्ती, भाषिक क्षमता.
आवश्यक साहित्य : पेन, पेन्सिल इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक कुटुंबातील सदस्यांची नावे व त्यांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते विचारतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना कुटुंबातील कोणाची मुलाखत घेणार हे विचारतात.
३) शिक्षक मुलाखत घेताना पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात व ती माहिती वहीत लिहिण्यास सांगतात.
४) मुलाखतीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खालील प्रकारचे प्रश्न विचारतात व त्याबद्दल चर्चा करतात.
प्रश्न :
१) तुम्ही कोणाची मुलाखत घेतली त्यांचे नाव सांगा?
२) त्यांचे तुमच्याबरोबर नाते काय आहे?
३) तुम्ही त्यांचीच मुलाखत का घेतली?
४) तुमच्या व त्यांच्या आवडीनिवडीत काय काय सारखे आहे?
५) त्यांच्या आवडीचा खेळ कोणता होता?
६) मुलाखत घेताना तुम्हाला कोणते अनुभव आले?
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी कुटुंबातील सदस्यांची नावे व त्यांच्याशी असलेले नाते सांगतात.
२) विद्यार्थी कुटुंबातील कोणाची मुलाखत घेणार हे सांगतात.
३) विद्यार्थी मुलाखत घेण्यापूर्वी पूर्वनियोजनात तयार केलेली प्रश्नावली लिहून घेतात.
४) विद्यार्थी मुलाखत घेऊन ती वहीत लिहून ठेवतात व त्याबाबत शिक्षकांबरोबर चर्चा करतात.