परिसरातील प्रार्थनास्थळांचा इतिहास जाणून घेणे | जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास-3 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : 3
उपक्रमाचे नाव : परिसरातील प्रार्थनास्थळांचा इतिहास जाणून घेणे
उपक्रमासाठी करावयाची पूर्वतयारी :
१) शिक्षक व पालकांच्या मदतीने परिसरातील प्रार्थनास्थळांची यादी करतील.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळाची माहिती कशी घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन करतील.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळाची रचना, स्थापत्य, बांधकाम, नमुना, कालखंड या अंगाने कशी माहिती संकलन करायची हे सांगतील.
उद्दिष्टे :
१) प्रार्थनास्थळांचा ऐतिहासिक व पौराणिक वारसा समजून घेणे.
२) विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांचा रचना, ऐतिहासिक वारसा, बांधकामशैली, इतिहास या अंगाने अध्ययन करण्यासाठी सक्षम करणे.
३) विविध प्रार्थनास्थळांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेणे.
कार्यवाही / अंमलबजावणी :
१) शिक्षक प्रार्थनास्थळांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय गट करतील.
२) गटनिहाय करावयाच्या प्रार्थनास्थळांना भेटी यांचे नियोजन शिक्षक करतील.
३) विद्यार्थी प्रार्थनास्थळांची गटनिहाय माहिती घेत असताना विद्यार्थी सुलभक म्हणून मार्गदर्शन करतील. ४) विद्यार्थी माहितीचे संकलन योग्य पद्धतीने करत आहेत, की नाही याची खातरजमा शिक्षक करतील.
५) शिक्षक विदयार्थ्यांना प्रार्थनास्थळाचा इतिहास जाणून घेण्यासाठी मदत करतील.
६) जमा केलेल्या माहितीच्या आधारे प्रार्थनास्थळाचा इतिहास लिहिण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करतील.
उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन :
१) विद्यार्थी समूहाद्वारे कसे अध्ययन करतात याचे निरीक्षण करणे.
२) प्रार्थनास्थळाची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी योग्य प्रश्नांची निवड करतात का हे पाहणे.
३) विद्यार्थी उचित माहितीचे संकलन करतात का हे तपासणे.
४) विद्यार्थी माहितीचे व्यवस्थापन कसे करतात याचे मूल्यांकन करणे.
उपक्रमाची फलनिष्पत्ती :
१) विद्यार्थ्यांना विविध प्रार्थनास्थळांचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व समजेल.
२) विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांचे सामाजिक उपक्रम यांची माहिती होईल.
३) विद्यार्थी इतिहास लेखनाविषयी प्राथमिक माहिती मिळवतील.
४) विद्यार्थ्यांमध्ये माहिती संकलनाचे व माहिती व्यवस्थापनाचे कौशल्य निर्माण होईल.