राहुटी | जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास-3 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव : राहुटी
पूर्वनियोजित कृती :
१) विद्यार्थ्यांना उपक्रमाची पार्श्वभूमी समजावून देणे.
२) केंद्र स्तरावर शाळा निवड व ठिकाण निश्चित करणे.
३) विद्यार्थ्यांना घटकानुसार राज्य विभागून देणे.
४) राज्याचा पेहराव, संस्कृती, पिके, खादयपदार्थ यांच्या माहितीचा संग्रह करणे.
५) उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या राहुटी पथकास विजेते घोषित करून पारितोषिक वितरण करणे.
६) या उपक्रमासाठी लागणारे विविध संदर्भ, पुस्तके, इंटरनेट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
उपक्रमाची उद्दिष्टे :
१) राहुट्या यांच्या माध्यमातून भौगोलिक ठिकाणे जाणून घेणे.
२) विद्यार्थ्यांना इतिहास लेखनासाठी विविध संदर्भ साहित्याचा उपयोग करण्यासाठी सक्षम करणे.
३) अन्य राज्यांची माहिती जाणून घेणे.
४) विद्यार्थ्यांमध्ये सहाध्यायी अध्ययनाद्वारे अध्ययनाचे कौशल्य विकसित करणे.
उपक्रमाची कार्यवाही व अंमलबजावणी :
१) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राहुटी ही संकल्पना समजावून देतील.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ग/गट यांनी एक एक राज्य घेऊन तेथील पिके, संस्कृती, मानवी जीवन, खादयपदार्थ, पेहराव, यांची माहिती जमा करण्यासाठी सांगतील. त्यासाठी आवश्यक ते संदर्भ साहित्य, पुस्तके, इंटरनेट आदी उपलब्ध करून देतील.
उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन :
१) शिक्षक विद्यार्थी एकटा असताना व समूहात असतांना कसे वागतो यांचे निरीक्षण करणे.
२) समाजमिती तंत्राच्या आधारे विद्यार्थ्यांचे समूहाची असलेले संबंध यांचे शिक्षक निरीक्षण करतील.
३) शिक्षक विद्यार्थी संदर्भसाहित्य कसे हाताळतात याचे अवलोकन करतील.
४) विद्यार्थी माहितीचे संकलन व माहितीचे व्यवस्थापन कसे करतात हे शिक्षक तपासतील.
उपक्रमाची फलनिष्पत्ती :
१) विद्यार्थ्यांमध्ये इतिहास व भूगोल या विषयांचा समन्वय साधून विषयांची आवड निर्माण होईल.
२) विद्यार्थ्यांना विविध राज्यांतील सण-उत्सव यांची माहिती होईल.
३) विद्यार्थ्यांमध्ये कृतीतून शिक्षण, सहाध्यायी अध्ययन ही संकल्पना विकसित होईल.
४) विद्यार्थी इतिहास लेखनाची प्राथमिक माहिती मिळवतील.
५) विद्यार्थी माहिती मिळवण्याचे कौशल्य व माहितीवर प्रक्रिया करण्याचे कौशल्य शिकतील.