उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव : संगणक, मोबाइल वापरत असताना घ्यावयाची सायबर सुरक्षा
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात संगणक, मोबाइल वापरत असताना सायबर सुरक्षा महत्त्वाची का आहे? याविषयी माहिती मिळवतील व त्याचा अभ्यास करतील.
दैनंदिन वापरातील माहिती देवाणघेवाण संबंधी विविध उपकरणे कोणती ?
समाजमाध्यमे म्हणजे काय ?
समाजमाध्यमांची उदाहरणे कोणकोणती ? उदाहरणे तयार करून ठेवतील.
समाजमाध्यमे वापरताना आपल्या उपकरणात सायबर सुरक्षा कशी ठेवावी ?
याबद्दल अधिक माहिती तयार करून ठेवतील.
विकसित होणारी कौशल्य / फलनिष्पत्ती- जबाबदारी, जाणीव जागृती, सर्जनशीलता, विदयार्थी ऑनलाइन कार्य करीत असताना सायबर सुरक्षा किती महत्त्वाची आहे हे जाणून घेतात.
आवश्यक साहित्य : शिक्षक निर्मित PowerPoint सादरीकरण, संगणक, मोबाइल
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात संगणक, मोबाइल वापरत असताना सायबर सुरक्षा महत्त्वाची का आहे? याविषयी माहिती देतात.
२) विविध उपकरणे कोणती? संगणक, मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप याविषयी माहिती देतात.
३) समाजमाध्यमे म्हणजे काय? समाजातील व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क करण्यासाठी वापरली जाणारी
साधने याविषयी चर्चा घडवून आणतात. ४) समाजमाध्यमांची उदाहरणे कोणकोणती ? WhatsApp Twitter, Digi locker, Facebook याबाबत
माहिती देतात.
५) समाजमाध्यमे वापरताना आपल्या उपकरणात सायबर सुरक्षा कशी ठेवावी? अधिकृत प्रणाली (सॉफ्टवेअर) वापर, अधिकृत संकेतस्थळावरून समाजमाध्यमे प्राप्त करणे, उपकरणांची सेटिंग अद्ययावत ठेवणे, अनधिकृत संकेतस्थळावरून कुठलीही माहिती/फोटो/संदेश प्राप्त न करणे याबाबत चर्चा करतात.
६) शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती देताना अँटीव्हायरस आणि अँटी-मॅलवेअर सॉफ्टवेअर वापरा. अज्ञात स्रोतांकडून डाऊनलोड टाळा असे आवाहन करतात.
७) यासारखे विविध सोशल मिडिया अप्स वापरत असताना सायबर सुरक्षा महत्त्वाची का आहे? वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी, सामाजिक दर्जा सुयोग्य राखण्यासाठी, एकमेकांचा आदर करण्यासाठी याबद्दल अधिक माहिती देतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी दैनंदिन जीवनात संगणक, मोबाइल वापरत असताना सायबर सुरक्षा महत्त्वाची का आहे? समजून घेतात.
२) विविध उपकरणे कोणती? संगणक, मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप याविषयी जाणून घेतात.
३) समाजमाध्यमे म्हणजे काय? समाजातील व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क करण्यासाठी वापरली जाणारी साधने याविषयी चर्चेत सहभाग घेतात.
४) समाजमाध्यमांची उदाहरणे कोणकोणती ? WhatsApp Twitter, Digi locker, Facebook याविषयी समजून घेतात.
५) समाजमाध्यमे वापरताना आपल्या उपकरणात सायबर सुरक्षा कशी ठेवावी? अधिकृत प्रणाली (सॉफ्टवेअर) वापर, अधिकृत संकेतस्थळावरून समाजमाध्यमे प्राप्त करणे, उपकरणांची सेटिंग अद्ययावत ठेवणे, अनधिकृत संकेतस्थळावरून कुठलीही माहिती/फोटो/संदेश प्राप्त न करणे याबाबत चर्चा करतात.
६) यासारखे विविध सोशल मिडिया अॅप्स वापरत असताना सायबर सुरक्षा महत्त्वाची का आहे? वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी, सामाजिक दर्जा सुयोग्य राखण्यासाठी, एकमेकांचा आदर करण्यासाठी हे समजून घेतात.
७) सामाजिक माध्यमांवर कोणतीही पोस्ट शेअर करीत असताना त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेणे. याबाबत माहिती समजून घेतात.
८) कोणतीही पोस्ट टाकताना कोणताही बाका प्रसंग निर्माण होणार नाही यादृष्टीने जबाबदारीने वागणे किती अत्यावश्यक आहे. याबाबत जाणून घेतात.
९) विविध सोशल मिडिया अॅप्सचा वापर करीत असताना सायबर सुरक्षा म्हणून त्यांना पासवर्ड देणे आणि तो मजबूत असावा तसेच सुरक्षेच्या कारणास्तव तो सातत्याने बदलता ठेवावा. हे समजून घेतात.
१०) विदयार्थी दैनदिन जीवनात स्वतः तसेच कुटुंबातील, शेजाऱ्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विविध सोशल मीडिया अॅप्सबाबत नेमकी कोणती सायबर खबरदारी घेतली पाहिजे? याची माहिती करून घेतात.
११) आपल्याद्वारे सामाजिक माध्यमांवर कोणतीही पोस्ट शेअर करीत असताना त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेतात.
१२) आपल्याद्वारे कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करताना सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची
खबरदारी घेऊन विविध सामाजिक माध्यमांवर जबाबदारीने वागतात. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतात.
१३) विद्यार्थी अँटीव्हायरस आणि अँटी-मॅलवेअर सॉफ्टवेअरचे महत्त्व जाणून घेतात आणि अज्ञात स्रोतांकडे
दुर्लक्ष करतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtu.be/UIcQbHrORt4?feature=shared
उदा. WhatsApp Twitter, Digi locker, Facebook, Instagram वर येणारे मेसेजस
उदा. Windows ऑपरेटिंग सिस्टिम, सॉफ्टवेअर Antivirus kits
1) https://www.youtube.com/live/5PwileChkvY?feature=shared
2) https://youtu.be/L19iP305qdQ?feature=shared
3) https://www.youtube.com/live/5PwileChkvY?feature=shared