माझ्या साठवलेल्या पैशांचे व्यवस्थापन | वित्तीय व्यवस्थापन/आर्थिक साक्षरता-3 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव : माझ्या साठवलेल्या पैशांचे व्यवस्थापन
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक मुलांना आर्थिक साक्षर कसे करावे याबाबत माहिती घेतात.
आर्थिक साक्षरता म्हणजे पैशांबाबत योग्य निर्णय घेण्याबाबत आवश्यक ज्ञान, कौशल्य संपादन करणे.
शिक्षक मुलांना त्यांना मिळणाऱ्या साठवलेल्या/बचत करत असलेल्या/पैशांबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रश्नावली तयार करतात.
१) तू कधी दुकानातून किराणा सामान आईला आणून देतो/देते काय ?
२) तुम्हाला आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू किंवा इतर नातेवाईक कधी पैसे देतात काय ?
३) मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता ?
४) मिळालेल्या पैशांची बचत करून तुम्ही तुमच्यासाठी शाळेतील आवश्यक साहित्य घेऊ शकता काय ?
५) मिळालेल्या पैशांच्या बचतीतून तुम्ही कधी आईला भाजी विकत घेण्यासाठी सुट्टे पैसे देऊ शकाल काय ?
६) पैशांच्या बचतीतून तुम्ही मित्र/मैत्रिणीकडे शाळेतील आवश्यक वस्तू नसेल तर ते घेण्यासाठी मदत करू शकाल काय ?
७) बचत केलेल्या पैशांचे कोणते फायदे होऊ शकतात ?
• विदयार्थी सादरीकरण झाल्यावर त्यांना बक्षीस फुल वही, पेन इ. देण्यासाठी नियोजन करतात. (बक्षीस देणे अपरिहार्य नाही. टाळ्या वाजवूनही कौतुक करता येऊ शकेल.)
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांचे वर्गातील संख्येनुसार गट तयार करतात. (किमान ५ विद्यार्थी एक गट याप्रमाणे)
२) शिक्षक मुलांना पूर्वनियोजनात तयार केलेली प्रश्नावली देतात.
३) मुलांना प्रश्नावली सोडविण्यासाठी वेळ देतात.
४) प्रश्नावली सोडवून झाल्यावर वरील प्रश्नानुसार सादरीकरण करण्यास सांगतात.
५) ज्या गटातील जास्त विद्यार्थी बचत करत आहेत त्यांचे कौतुक करतात.
६) जे विद्यार्थी बचतीच्या पैशांचे खादयपदार्थ वा इतर अनावश्यक खर्च न करता स्वतःच्या शाळेतील आवश्यक वस्तू, आई-वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रीण यांना मदत करतात त्यांचे कौतुक करतात.
विद्यार्थी कृती :
१) विदयार्थी पूर्वनियोजनात तयार केलेली प्रश्नावली सोडवतात. उदा.
• तू कधी दुकानातून किराणा सामान आईला आणून देतो/देते काय ? - होय
तुम्हाला आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू किंवा इतर नातेवाईक कधी पैसे देतात काय? होय
मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता? बचत करतो.
• मिळालेल्या पैशांची बचत करून तुम्ही तुमच्यासाठी शाळेतील आवश्यक साहित्य घेऊ शकता काय ? होय
मिळालेल्या पैशांच्या बचतीतून तुम्ही कधी आईला भाजी विकत घेण्यासाठी सुट्टे पैसे देऊ शकाल काय ? - होय
पैशांच्या बचतीतून तुम्ही मित्र/मैत्रिणीकडे शाळेतील आवश्यक वस्तू नसेल तर ते घेण्यासाठी मदत करू शकाल काय ? होय
बचत केलेल्या पैशाचे कोणते फायदे होऊ शकतात? पेन, पेन्सिल, वही विकत घेणे, आई-बाबा यांना मदत करणे, गिफ्ट देणे, मित्र-मैत्रीण यांना उधार देणे.
२) प्रश्नावली सोडवून झाल्यावर प्रश्नानुसार सादरीकरण करतात.
३) ज्या गटातील जास्त विद्यार्थी बचत करत आहेत त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक करतात.
४) जे विद्यार्थी बचतीच्या पैशांचे खाद्यपदार्थ वा इतर अनावश्यक खर्च न करता स्वतःच्या शाळेतील आवश्यक वस्तू, आई वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रीण यांना मदत करतात त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक करतात.
संदर्भ साहित्य : https://youtu.be/JqYoLQXO7j4?si=KRgweA7jtD6BETU