सोडवून तर पाहा | व्यक्तिमत्त्व विकास-3 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव : सोडवून तर पाहा
पूर्वनियोजित कृती :
• विविध पारंपरिक कोडी, बौद्धिक खेळ, हुमणे यांची माहिती एकत्रित करतात. त्याचबरोबर वर्तमानपत्रातील बौद्धिक खेळ. उदा., सुडोकू, शब्दकोडे, अंककोडे यांविषयी एकत्रित मांडणी करतात. विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती तर्क, कार्यकारणभाव, चिकित्सक विचार, पडताळा घेणे, सर्जनशीलता, बौद्धिक विकास, भाषिक विकास.
आवश्यक साहित्य : विविध कोडी, चित्रे, शब्दकोडे.
शिक्षक कृती :
१) बौद्धिक विकास हा व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा पैलू आहे. याकरिता वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना विविध पारंपरिक कोडी, बौद्धिक कोडी, पारंपरिक हुमणे, Tic Tac Toe खेळ स्वतंत्र किंवा गटात सोडविण्यास सांगतील. यांची गटात स्पर्धा घेण्याचे नियोजन करतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांनी विविध कोडी सोडविल्यानंतर छोटी छोटी कोडी, सुडोकू, शब्द कोडे, अंक कोडे, स्वतः तयार करण्यास सांगतील. निर्मिती केलेली कोडी इतर गटांना सोडविण्याकरिता देतील. निर्मिती केलेली कोडी, साहित्य यांचे वर्गात प्रदर्शन भरवतात.
विद्यार्थी कृती :
१) शिक्षकांनी दिलेली कोडी, हुमणे सोडविण्याकरिता प्रत्यक्ष उत्स्फूर्त सहभाग नोंदवतील. वर्गात स्पर्धेमध्ये सक्रिय सहभागी होतील.
२) विदयार्थी प्रत्यक्ष कोडी, शब्दकोडी, अंककोडी सोडवतील. प्रत्यक्ष स्वतः गटात सुडोकू, शाब्दिक कोडे, अंक कोडे तयार करतील.
संदर्भ साहित्य :
१) जादुई गणित पुस्तिका, वर्तमानपत्रातील शाब्दिक कोडे, सुडोकू.