मातकाम: भातुकलची भांडी तयार करूया | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-3 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव : मातकाम: भातुकलची भांडी तयार करूया.
पूर्वनियोजित कृती :
• माती चाळून भिजवतात, विद्यार्थ्यांना सोबत हात पुसण्यासाठी कापड, वस्तू तयार करताना आधार म्हणून पुठ्ठ्याचा तुकडा, पाणी घेण्यासाठी छोटे भांडे आणायला सांगतात.
विकसित होणारी कौशल्ये- सर्जनशीलता, कारककौशल्ये, सौंदर्यदृष्टी
आवश्यक साहित्य : ओली माती, पाण्यासाठी भांडे, जुने कापड, पुठ्ठ्याचा तुकडा.
शिक्षक कृती :
१) विद्यार्थ्यांना रांगेत अंतर ठेवून बसवतात.
२) अगोदरच्या दिवशी भिजवून ठेवलेल्या मातीच्या गोळ्यामधून माती घेऊन १५ ते २० रोली तयार करतात. त्यांना एकावर एक रचून हंड्याचा आकार तयार करतात. पाण्याचा वापर करून आकाराला गुळगुळीतपणा आणतात.
३) मातीपासून तवा, कढई, पोळपाट, तांब्या असे आकार तयार करतात.
४) आकार तयार करताना मातीचा वापर, आकार तयार करताना दयायचा दाब, प्रमाण, वस्तू सुकवण्याची पद्धत याविषयी माहिती देतात.
५) विद्यार्थ्यांना मातीचा गोळा वाटप करून त्यांच्या आवडीप्रमाणे भातुकलीची भांडी तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतात. आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मदत करतात.
विद्यार्थी कृती :
१) विदयार्थी शिक्षकांच्या मातीपासून विविध आकार तयार करण्याच्या कृतीचे निरीक्षण करतात.
२) ओल्या मातीपासून रोली, पोली, गोली या आकारापासून आवडणारी भातुकलीची भांडी तयार करतात.
३) पाण्याचा वापर करून भांड्यांना गुळगुळीतपणा आणतात.
४) पुठ्ठ्याच्या तुकड्यावर तयार झालेली भांडी सुकायला ठेवतात.
५) जुन्या कापडाच्या तुकड्याने हात, भांडे, जागा स्वच्छ करतात.
संदर्भ साहित्य :