धातूकाम | विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअरविषयक मार्गदर्शन-3 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव : धातूकाम
पूर्वनियोजित कृती : माहिती वेल्डिंग बाबत
नियोजित कृती / पूर्वनियोजन :
• शिक्षक परिसरातील वेल्डिंगच्या दुकानाची माहिती घेतात, भेट देण्याचे ठिकाण ठरवतात.
• शिक्षक विद्यार्थ्यांना भेटीच्या स्थळी नेण्यासाठी पालकांची परवानगी घेतात. ३ शिक्षक विद्यार्थ्यांशी चर्चा करून माहिती घेण्याचे घटक ठरवतात.
> वेल्डिंग म्हणजे काय?
> वेल्डिंगचे प्रकार कोणते ?
> वेल्डिंगचे उपयोग कोणते ?
➤ वेल्डिंगशी निगडीत व्यवसाय कोणते ?
> वेल्डमेंट म्हणजे काय?
> वेल्डिंग चे सूत्र काय?
शिक्षक विद्यार्थ्यांचे वरील घटकानुसार माहिती घेण्यासाठी गट तयार करतात. त्यांना माहिती घेण्यासाठी घटक वाटून देतात.
भेटीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यासाठी नियम सांगतात.
> कोणत्याही वस्तूला हात लावू नये.
> प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणापासून सुरक्षित अंतरावर राहावे.
> अनावश्यक गर्दी टाळावी.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- निरीक्षण, सहयोग कौशल्य, प्रश्न कौशल्य व्यावहारिक कौशल्य
आवश्यक साहित्य : वही, पेन, पाणी बॉटल, प्रथमोपचार पेटी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना वेल्डिंगच्या दुकानात घेऊन जातात.
२) वेल्डींगचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस त्याचे कार्य करण्यास सांगतात.
३) विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांचे पालन करण्यास सांगतात
४) विद्यार्थ्यांना निरीक्षण करून प्रश्न विचारण्यास सांगतात.
५) विद्यार्थ्यांना त्यांना दिलेल्या घटकाबाबत अधिक माहिती घेऊन पुढच्या वेळी उपलब्ध वेळेत गटात सादरीकरण करण्यास सांगतात
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी सुरक्षा नियमांचे पालन करतात.
२) दिलेल्या घटकानुसार प्रश्न विचारतात व खालील प्रमाणे माहिती समजून घेतात व टिपणे घेतात.
३) वेल्डिंग ही धातू किंवा थर्मोप्लास्टिक जोडण्याची प्रक्रिया आहे. यात खूप उष्णतेच्या, दाबाच्या साहाय्याने जोडण्याची प्रक्रिया केली जाते.
४) वेल्डिंग चे प्रकार गॅस मेटल आर्क वेल्डिंग, फ्लक्स कोरडे वायर-आर्क वेल्डिंग. शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग, गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग.
५) वेल्डिंगचा उपयोग विविध धातूची संरचना, भाग आणि उपकरणे तयार करण्यासाठी केला जातो.
६) वेल्डिंगशी निगडीत व्यवसाय मिलिटरी वेल्डर, एमआयजी वेल्डर, अंडरवाटर वेल्डर, वेल्डिंग इन्स्पेक्टर,
पाईप वेल्डर, फेब्रीकेटर वेल्डर, वेल्डिंग इंजिनीअर इत्यादी.
७) वेल्डमेंट म्हणजे -
वेल्डिंगने दोन तुकडे जोडल्यानंतर जो जोड तयार होतो त्याला वेल्ड्मेंट म्हणतात.
८) विद्यार्थी विल्डिंग प्रक्रियेबाबत इंटरनेटवरून अधिक माहिती घेतात व शिक्षकानी सांगितलेल्या वेळेत सादरीकरण करतात.