बास्केटबॉल | पारंपरिक खेळांचा परिचय-3 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रमाचे नाव : बास्केटबॉल
पूर्वनियोजित कृती :
१) शिक्षक बास्केटबॉल खेळाशी संबंधित मैदान, नियम, कौशल्य व फायदे याविषयी माहितीचे संकलन करतात.
२) विद्यार्थ्यांना बास्केटबॉल या खेळाविषयी माहिती गोळा करण्यास सांगतात व त्यासाठी घटक ठरवून देतात.
बास्केटबॉल खेळाच्या मैदानाचे मोजमाप काय असते ?
बास्केटबॉल संघात किती खेळाडू असतात ?
बास्केटबॉल हा कोण कोणत्या नंबरचा असतो ?
बास्केटबॉल खेळासाठी कोणता पोशाख आवश्यक आहे?
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती जलदगतीने निर्णय घेणे, धोरणात्मक विचार, संघभावना, सहकार्य, समन्वय, अचूकता.
आवश्यक साहित्य : चुना, दोरी, मेजरींग टेप, बास्केटबॉल, शिटी.
शिक्षक कृती :
१) बास्केटबॉल खेळण्यासाठी लागणाऱ्या (२८ मी १५ मी) मैदानाची आखणी करतात.
२) बास्केटबॉल खेळा विषयी विद्यार्थ्यांना माहिती विचारतात.
३) बास्केटबॉल खेळाविषयी खालील माहिती देतात.
मैदान : २८ मी × १५ मी (ज्या ठिकाणी मातीचे मैदान व बास्केटबॉल पोल उपलब्ध आहेत त्या ठिकाणी चुना व मेजरींग टेप, दोरी यांच्या साहाय्याने आखणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी बास्केटबॉल पोल उपलब्ध नसतील त्या ठिकाणी बांबूच्या व रिकामी टोपलीच्या (टोपीला छिद्र करून) साहाय्याने बास्केटबॉल पोल तयार करणे यावा.)
खेळाडू : १२ खेळाडू (५ खेळाडू मैदानात खेळतात, ७ बदली खेळाडू असतात.)
नियम :
• प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांना धक्का न मारता हा खेळ खेळावा.
• जेव्हा प्रतिस्पर्धी बचावासाठी समोर अथवा जवळ उभा असेल तेव्हा खेळाडूंनी ५ सेकंदापेक्षा जास्त वेळ चेंडू हातात ठेवू नये म्हणजेच पास, ड्रिबल किंवा गोल कडे शूट करावा.
• संघाच्या ताब्यात चेंडू आल्यानंतर आठ सेकंदात चेंडू मध्यरेषा पार करून प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टवर
चाल करून जावे व एकूण २४ सेकंदात प्रतिस्पर्ध्यावर रिंगवरून गोल करण्याचा प्रयत्न करावा.
• हातात चेंडू घेऊन चालताना अथवा पळताना एकापेक्षा जास्त पावले घेण्यास मनाई असून खेळाडूंनी एकमेकांकडे चेंडू पास करत अथवा ट्रिबल करत प्रतिस्पर्ध्यावर चाल करून जावे.
४) कौशल्य : ड्रिबलिंग, पासिंग, शूटिंग, फूटवर्क, रिबाऊंडिंग
५) बास्केटबॉल खेळाचे फायदे :
बास्केटबॉल हा रोमांचक खेळासोबतच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे.
बास्केटबॉल खेळल्याने शारीरिक भावनिक आणि सामाजिक विकास होतो.
बास्केटबॉल खेळल्याने स्नायू मजबूत होतात आणि तग धरण्याची क्षमता वाढते.
नियमित बास्केटबॉल खेळल्याने हाडे मजबूत होतात हृदय निरोगी राहते आत्मविश्वास वाढतो.
तणावाची पातळी कमी होऊन आनंदी राहण्यास मदत होते.
शारीरिक संतुलन आणि समन्वय सुधारते आणि शरीराचा संरचनात्मक विकास होतो.
खेळताना पाळावयाच्या सुरक्षिततेच्या नियमांविषयी विद्यार्थ्यांना अवगत करतात.
खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार करून बास्केटबॉल हा खेळ कसा खेळावा हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी बास्केटबॉल या खेळाविषयी संकलित केलेली माहिती सांगतात.
बास्केटबॉल खेळाच्या मैदानाचे मोजमाप काय असते? (उत्तर २६ मी × १५ मी)
बास्केटबॉल संघात किती खेळाडू असतात ? (उत्तर : १२ खेळाडू)
बास्केटबॉल हा कोण कोणत्या नंबरचा असतो? (उत्तर मुलींसाठी ६ नंबर, मुलांसाठी ७ नंबर)
बास्केटबॉल खेळासाठी कोणता पोशाख आवश्यक आहे? (उत्तर हाफ पॅन्ट, मुलांसाठी सँडो
बनियन, मुलींसाठी टी-शर्ट व शूज) २) बास्केटबॉल खेळाविषयी शिक्षकांनी सांगितलेले नियम, तंत्र, कौशल्य व फाऊल हे काळजीपूर्वक ऐकतात व समजून घेतात.
३) खेळ खेळताना पाळावयाच्या सुरक्षिततेच्या नियमांविषयी जाणून घेतात.
४) शिक्षकांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकाप्रमाणे प्रत्यक्ष खेळ खेळण्यासाठी सुरुवात करतात.
संदर्भ साहित्य : 1) https://youtu.be/q-v9LsFpMpI?si=oC-DgI4RdG101Ds-
2) https://youtu.be/qgg2PU5aLBA?si=9vfvkMgfWcuk8hoX
3) https://youtu.be/vse-ENNEz8w?si=0XivmyMdNPWkW42P