कागदकाम (ओरिगामी/घडीकाम) | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-4 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ४
उपक्रमाचे नाव : कागदकाम (ओरिगामी/घडीकाम)
पूर्वनियोजित कृती :
• सोबत घोटीव कागद/पातळ रंगीत कागद आणण्याविषयी सूचना देतात. घड्यांचे प्रकार दर्शविणारा व्हिडिओ तयार ठेवतात.
• कागदाला घड्या घालून मासा, बेडूक, फुलपाखरू, कुत्र्याचा चेहरा, ससा, फूल इत्यादी आकार तयार करण्याची कृती पाहून ठेवतात.
विकसित होणारी कौशल्ये- नवनिर्मिती, कल्पकता, हस्तकौशल्य, एकाग्रता
आवश्यक साहित्य : घोटीव कागद / कार्डशीट पेपर, मोजपट्टी, घड्यांचे प्रकार दर्शविणारा व्हिडिओ इ.
शिक्षक कृती :
१) शिक्षकांनी घोटीव कागद / कार्डशीट पेपरच्या साहाय्याने मासा, होडी, बेडूक, फुलपाखरू, कुत्रा, कुत्र्याचा चेहरा, ससा, विमान यापैकी काही वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवतात.
२) विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे कागदकाम/घडीकाम करण्याची संधी देतात.
३) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांचे कागदी वस्तू बनविण्याचे प्रात्याक्षिक पाहतात.
२) शिक्षकांच्या सूचनेनुसार व प्रात्यक्षिकाप्रमाणे विद्यार्थ्यांनी कागदकाम/घडीकाम करतात. सूचनेनुसार कागद कामातून आवडती वस्तू तयार करतात.
३) शिक्षकांच्या सूचनेनुसार प्रदर्शन वस्तू मांडतात व इतर विद्यार्थ्यांच्या वस्तूदेखील निरीक्षण करतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtu.be/C9-S27KeVvo?feature=shared