जाणून घेऊया (यशस्वी व्यक्तींची मुलाखत) | क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती-4 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ४
उपक्रमाचे नाव : जाणून घेऊया (यशस्वी व्यक्तींची मुलाखत)
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक आपल्या शालेय परिसरातील, गावातील यशस्वी व्यक्तींची विद्यार्थ्यांच्या मदतीने यादी करतात. विविध ठिकाणी काम करणाऱ्या यशस्वी व्यक्तींची माहिती मिळवतात. (यशस्वी उद्योजक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी इत्यादी.)
यादीतील यशस्वी व्यक्तींची मुलाखतीसाठी निवड करून त्यांना याबाबत पूर्वकल्पना देतात व त्यांची परवानगी घेतात.
शिक्षक निवड केलेल्या यशस्वी व्यक्तींच्या क्षेत्रानुसार विद्यार्थ्यांचे गट करून विद्यार्थ्यांकडून मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करून घेतात.
उदा.
१) तुमचे पूर्ण नाव काय ?
२) तुमचे शिक्षण किती झाले आहे?
३) तुम्हाला या क्षेत्रात/व्यवसायात का यावेसे वाटले?
४) शिक्षण पूर्ण करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का?
५) या क्षेत्रात/व्यवसायात येण्यासाठी तुम्ही काय तयारी केली ?
६) या क्षेत्रात/व्यवसायात येण्यासाठी तुम्हाला कोणत्या समस्या आल्या? त्यावर तुम्ही कशी मात केली.
७) या क्षेत्रात/व्यवसायात येण्यासाठी कोणाचे मार्गदर्शन मिळाले?
८) तुमच्या कामात कोणाकोणाची मदत झाली ?
९) तुमचे दिवसभराचे वेळापत्रक कसे असते ?
१०) कामाव्यतिरिक्त तुम्ही कोणते छंद जोपासता ?
११) भविष्यातील तुमचे नियोजन काय आहे? इत्यादी.
मुलाखत घेताना शिस्तीचे पालन करण्यासंदर्भात सूचना देतात. (उदा. शांतता राखणे, आपापसात न बोलणे, मध्येच प्रश्न न विचारणे, एका प्रश्नाचे उत्तर पूर्ण झाल्यानंतर दुसरा प्रश्न विचारावा, महत्त्वाची माहिती लिहून ठेवा, नवीन शब्द ऐकला तर लिहून ठेवावा इत्यादी.)
मुलाखतीची वेळ, ठिकाण निश्चित करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : निरीक्षण, संप्रेषण, अभिव्यक्ती, भाषिक क्षमता, सामाजिक भावना.
आवश्यक साहित्य : वही, पेन, प्रश्नावली, कॅमेरा इत्यादी.
शिक्षक कृती :
१) पूर्वतयारीत ठरल्याप्रमाणे विद्यार्थी संख्येनुसार विद्यार्थ्यांचे गट करून मुलाखतीचे आयोजन करतात.
२) आवश्यक तेथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
३) शिक्षक मुलाखत झाल्यानंतर मिळालेल्या माहितीची विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करतात.
उदा.
तुम्ही कोणाची मुलाखत घेतली?
तुम्हांला त्यांचा कोणता गुण आवडला ?
या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?
मुलाखत घेताना तुम्हांला कोणते अनुभव आले ?
तुम्ही या मुलाखतीतून काय शिकलात ?
४) शिक्षक मुलांना आलेले अनुभव, मिळालेली माहिती याचे संकलन करतात.
५) शिक्षक मुलांकडून मुलाखतीचे अहवाल लेखन करून घेतात.
विद्यार्थी कृती :
१) मुलाखतीसाठी यशस्वी व्यक्तींची नावे सुचवतात.
२) गटागटाने वेगवेगळ्या यशस्वी व्यक्तींच्या मुलाखतीसाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने प्रश्नावली तयार
करतात.
३) प्रत्यक्ष मुलाखत घेतात व उत्तरे नोंदवतात.
४) आवश्यक तेथे व शक्य असल्यास फोटो घेतात.
५) मुलाखत झाल्यानंतर वर्गातील चर्चेत सहभागी होतात.
६) मुलाखतीचे अहवाल लेखन करतात. उपलब्ध झाल्यास मुलाखतीचा फोटो जोडतात.