उपक्रम क्रमांक : ४
उपक्रमाचे नाव : अभिरूप ग्रामसभा
पूर्वनियोजित कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना गावातील ग्रामपंचायत, त्यांची कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती देतात.
२) आवश्यकतेनुसार संबधित व्हिडिओ सादरीकरण, प्रत्यक्ष ग्रामपंचायतील भेट देण्याचे नियोजन करतात.
३) अभ्यासाकरिता आणि अधिक माहिती करिता पुरेसा कालावधी व स्रोत उपलब्ध करून देतात. जसे इंटरनेट, संगणक इत्यादी.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना ग्रामसभेमधील लोकप्रतिनिधी, निवड प्रक्रिया निकष याबद्दल माहिती गोळा करण्यास सांगतात.
५) शिक्षक विद्यार्थ्यांना उपक्रमादरम्यान होणारी चर्चा, प्रत्येक व्यक्तीची भूमिका याविषयी माहिती देतात.
कृती :
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: नेतृत्व, संघभावना, संवाद, कौशल्य, संप्रेषण, संविधानिक मुल्ये. आवश्यक साहित्य : टेबल, खुर्चा आणि स्टेशनरीसह सुसज्ज वर्गखोली.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांसोबत सर्व फर्निचरने सुसज्ज खोलीत बैठक व्यवस्था करून घेतात.
२) शिक्षक आवश्यक स्टेशनरी उपलब्ध करून देतात. जसे कागद, पेन, पेन्सिल इत्यादी.
३) नियोजनानुसार विद्यार्थ्यांकडून अभिरूप ग्रामसभा यांची बैठक व्यवस्था करून घेतात.
४) अभिरूप ग्रामसभेचे प्रत्यक्ष कामकाज किमान दोन तास चालेल या दृष्टीने चर्चेचे मुद्दे, निर्णय याची नोंद घेतात. उदा., ग्रामसभेची विषयपत्रिका, गावातील समस्या व त्यावर उपाय, आवश्यक ठराव इत्यादी.
विद्यार्थी कृती :
१) शिक्षकांच्या मदतीने खोलीत आवश्यक फर्निचरसह बैठक व्यवस्था करतात.
२) अभिरूप ग्रामसभेतील कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेतात.
३) सदर उपक्रमात अभिप्राय नोंदवितात.