सायबर सुरक्षा संसाधनांची ओळख | तंत्रज्ञान कौशल्य सायबर सुरक्षितता-4 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ४
उपक्रमाचे नाव : सायबर सुरक्षा संसाधनांची ओळख
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक खालील मुद्द्यांचा अभ्यास करून, एक आकर्षक पीपीटी (PPT) तयार करतील.
सायबर सुरक्षा म्हणजे काय?
सायबर सुरक्षा उपाय
विविध सायबर सुरक्षा यंत्रणा
सायबर सुरक्षा जागरूकता करणाऱ्या शासकीय, निमशासकीय संस्था
सायबर सुरक्षा दिन
एक अध्यापक, विद्यार्थी व नागरिक म्हणून आपली जबाबदारी त्याबाबत आवश्यक माहिती मिळवतील.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: जाणीवजागृती, सहकार्य, समन्वय
आवश्यक साहित्य : शिक्षकनिर्मित PowerPoint सादरीकरण, संगणक, मोबाइल
शिक्षक कृती :
शिक्षक खाली नमूद केल्यानुसार आवश्यक माहिती, स्पष्टीकरण देतील व चर्चा घडवून आणतील.
१) शिक्षक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा म्हणजे काय? स्वतः किंवा इतरांचे संगणकप्रणाली, कम्युनिकेशन उपकरणे, डेटा सेंटर्स, नेटवर्क्स इत्यादींना दुर्भावनापूर्ण हल्ल्यांपासून, सायबर हल्ल्यांपासून संरक्षित करण्यासाठी केलेल्या कार्यक्षम सुरक्षाउपाय तंत्र याविषयी माहिती देतात.
२) सायबर सुरक्षाउपाय स्वतः किंवा इतरांच्या नियमित वापरत असलेल्या वेबसाईट अधिकृत असणे, नियमित आपल्या उपकरणांची सेटिंग अद्ययावत करणे, कुठलीही घटना घडल्यास आपल्या घरातील, जवळच्या व्यक्तींचा सल्ला घेणे.
३) सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम कोणकोणत्या शासकीय, निमशासकीय संस्थांमार्फत आयोजित केले जातात ? - राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सी (एनसीएसए) यासाठी विविध संकेतस्थळ आपणास उपयुक्त आहेत, https://www.ncsira.org/home/, सायबर सुरक्षा आणि क्राइम रिस्पॉन्स सेंटर (सीएससीआरसी): https://cybercrime.gov.in/, सायबर टिप्स हेल्प लाइन : १९३०, https://www.cyberlawsindia.net/ याबाबत सविस्तर माहिती देतात.
४) सायबर सुरक्षा दिन कधी साजरा करतात ? ५ फेब्रुवारी हा दिन भारतात 'Safe Internet Day' म्हणून साजरा करावा. यादिवशी सायबर जागरूकतेबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
५) एक अध्यापक, विद्यार्थी व नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय? आपल्या परिसरातील सायबर सुरक्षा पुरविणाऱ्या अधिकृत संस्था, व्यक्ती यांचे संपर्क क्रमांक नेहमी सोबत ठेवावे, शासनाने नेमून दिलेल्या सायबर विश्वात सुरक्षित व संरक्षित शालेय वातावरण निर्मितीकरिता मार्गदर्शक तत्त्वे, धोरणे व पद्धतीचे पालन करा. आपल्या विद्यार्थ्यांच्या हालचाली, वर्तनावर लक्ष ठेवून त्यांना काही मदतीचे गरज आहे काय ? याबाबत नेहमी जागृत रहा.
त्याबाबत अधिक माहिती देतात.
विद्यार्थी कृती :
विदयार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार खालील मुद्द्यांबाबत कृती करतील.
१) सायबर सुरक्षा म्हणजे काय ? स्वतः किंवा इतरांचे संगणकप्रणाली, कम्युनिकेशन उपकरणे, डेटा सेंटर्स, नेटवर्क्स इत्यादींना दुर्भावनापूर्ण हल्ल्यांपासून, सायबर हल्ल्यांपासून संरक्षित करण्यासाठी केलेल्या कार्यक्षम सुरक्षाउपाय तंत्र होत.
२) सायबर सुरक्षा उपाय स्वतः किंवा इतरांच्या नियमित वापरत असलेल्या वेबसाईट अधिकृत असणे, नियमित आपल्या उपकरणांची सेटिंग अदद्ययावत करणे, कुठलीही घटना घडल्यास आपल्या घरातील, जवळच्या व्यक्तींचा सल्ला घेणे. याबाबत माहिती घेतील व चर्चा करतील.
३) सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम कोणकोणत्या शासकीय, निमशासकीय संस्थांमार्फत आयोजित केले जातात ? - राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सी (एनसीएसए) यासाठी विविध संकेतस्थळ आपणास उपयुक्त आहेत, https://www.ncsira.org/home/, सायबर सुरक्षा आणि क्राइम रिस्पॉन्स सेंटर (सीएससीआरसी): https://cybercrime.gov.in/, सायबर टिप्स लाइन : १९३०, https://www.cyberlawsindia.net/ याबाबत सविस्तर माहिती देतात.
४) 'सायबर सुरक्षा दिन' कधी साजरा करतात ? ५ फेब्रुवारी हा दिन भारतात 'Safe Internet Day' म्हणून साजरा करावा. यादिवशी सायबर जागरूकतेबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
५) एक अध्यापक, विदयार्थी व नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय ? आपल्या परिसरातील सायबर सुरक्षा पुरविणाऱ्या अधिकृत संस्था, व्यक्ती यांचे संपर्क क्रमांक नेहमी सोबत ठेवावे, शासनाने नेमून दिलेल्या सायबर विश्वात सुरक्षित व संरक्षित शालेय वातावरण निर्मितीकरिता मार्गदर्शक तत्त्वे, धोरणे व पद्धतीचे पालन करा. आपल्या विद्यार्थ्यांच्या हालचाली, वर्तनावर लक्ष ठेवून त्यांना काही मदतीचे गरज आहे काय ? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊन नेहमी जागृत राहतात.
संदर्भ साहित्य :
1) https://www.youtube.com/watch?v=vBcArxypYRg
2) https://www.youtube.com/watch?v=TS1ydjYpjT8
3) https://www.youtube.com/watch?v=3e4JdZyrJGg