रिकाम्या खोक्यांपासून गाडी तयार करणे. (कागदकाम व पुठ्ठाकाम) | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-उपक्रम 5 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक: 5
उपक्रमाचे नाव : रिकाम्या खोक्यांपासून गाडी तयार करणे. (कागदकाम व पुठ्ठाकाम)
व्हिडिओ:
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांना सोबत रिकामे खोके, रिकाम्या बाटल्यांची गोल झाकण चार, दोन पेनाच्या रिफिल्स किंवा दोन काड्या, डिंक, कात्री, रंगीत कागदाचे तुकडे, दोरा इत्यादी वस्तू आणायला सांगतात.
विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करून ठेवतात.
संबंधित व्हिडिओ तपासून ठेवतात.
विकसित होणारी कौशल्ये: Creative Thinking, सर्जनशीलता, निरीक्षण
आवश्यक साहित्य: रिकामे खोके, रिकाम्या बाटल्यांची चार गोल झाकणे, दोन पेनाच्या रिफिल्स किंवा दोन काड्या, डिंक, कात्री, रंगीत कागदाचे तुकडे, दोरा इत्यादी.
शिक्षक कृती :
१) विद्यार्थ्यांना गटाने बसवतात. गाड्यांची विविध चित्रे आणि पुठ्तयापासून गाडी तयार करण्याचा व्हिडिओ दाखवतात.
२) त्याचे पुन्हा निरीक्षण करायला सांगतात. प्रथम गाडीच्या विविध भागांचे खोक्यावर रेखाटन करतात.
आवश्यक भाग कात्री/कटरने कापून घेतात.
• एक आयताकृती लहान रिकामे खोके घेतात.
आवश्यक तिथे खिडक्या, दरवाजे पेन्सिलने काढून घेतात. रंगीत कागद / रंगाने सजावट करतात.
ज्या ठिकाणी चाके बसवायची आहेत, त्या बाजूला छिद्र पाडतात. चाके एकमेकांना जोडण्यासाठी पेनाची रिफिल किंवा दोन जाड काड्या घेतात. तळाच्या पुठ्ठ्यावर रिफिल आणि बुचाच्या साहाय्याने तयार केलेल्या चाकांना चिकटवून घेतात. तयार झालेली गाडी आवडत्या रंगाने आकर्षक रंगवतात,
३) विद्यार्थ्यांना गटागटात गाडी तयार करायला प्रोत्साहित करतात. सर्व गाड्या सपाट पृष्ठभागावर प्रदर्शित करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी गटाने बसतात. गाड्यांची विविध चित्रे आणि पुठ्ठ्यापासून गाडी तयार करण्याचा व्हिडिओ पाहतात.
२) प्रथम गाडीच्या विविध भागांचे खोक्यावर रेखाटन करतात. आवश्यक भाग कात्री/कटरने कापून घेतात.
• एक आयताकृती लहान रिकामे खोके घेतात.
• आवश्यक तिथे पेन्सिलने खिडक्या, दरवाजे काढून घेतात. रंगीत कागद / रंगानी सजावट करतात,
ज्या ठिकाणी चाके बसवायची आहेत. त्या बाजूला छिद्र पाडतात.
चाके एकमेकांना जोडण्यासाठी पेनाची रिफिल किंवा दोन जाड काड्या घेतात. तळाच्या पुठ्यावर रिफिल आणि बुचाच्या साहाय्याने तयार केलेल्या चाकांना चिकटवून घेतात. नंतर चारही उभ्या बाजू छत चिकटवतात.
तयार झालेली गाडी आवडत्या रंगाने आकर्षक रंगवतात.
• सर्व गाड्या सपाट पृष्ठभागावर प्रदर्शित करतात.