उद्योजकता | विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअरविषयक मार्गदर्शन-5 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ५
उपक्रमाचे नाव : उद्योजकता
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक मुख्याध्यापक व इतर शिक्षक यांचेशी चर्चा करून परिसरातील खाऊ गल्लीतील विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे उद्योजक यांची विद्यार्थ्यांनी मुलाखत घेण्याचे उद्दिष्ट सांगून तारीख, नियोजन याबाबत चर्चा करतात. (उद्दिष्टे - १) उदयोजकतेबाबत विद्यार्थ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे. २) श्रमप्रतिष्ठा याबाबत आदर निर्माण करणे.)
शिक्षक विद्यार्थ्यांचे वर्गातील संख्येनुसार गट तयार करतात. (एका गटात किमान ५ विद्यार्थी)
• शिक्षक मुलांना वर्गातील केलेल्या गट संख्येनुसार परिसरातील यशस्वी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या यशस्वी हातगाडीवाले यांची माहिती घेण्यास सांगतात. (यशस्वी ज्यांच्या हातगाडीवर खादद्यपदार्थ घेण्यासाठी सतत मोठ्या प्रमाणात गर्दी असते.)
शिक्षक मुलांमध्ये हातगाडीवाल्याने उदयोग का सुरू केला, त्यामागची प्रेरणा, उदयोजकतेचा दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी खालील प्रश्नावली तयार करतात.
१) आपले शिक्षण किती झाले आहे?
२) हा उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा काय होती?
३) उदयोग सुरू करण्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागली?
४) उद्योग सुरू करताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले काय ?
५) अडचणींवर आपण कशी मात केली?
६) सुरुवातीपासूनच ग्राहकांची अशी गर्दी होती काय ?
७) ग्राहक येण्यासाठी आपण नेमके काय करता?
८) ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आपण कोणती काळजी घेता?
९) आपली रोज किती कमाई होते सांगू शकाल काय?
१०) या व्यवसायासाठी किती खर्च करावा लागतो सांगू शकाल काय ?
११) खादयपदार्थ आपण तयार करता काय ?
१२) खाद्यपदार्थ तयार करताना कोणती काळजी घेता?
१३) हा उद्योग सुरू करण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत असे वाटते?
१४) यापुढे आणखी काय करायचे स्वप्न आहे?
१५) शिक्षक खादयपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना मुलाखतीची दिनांक सांगतात.
१६) शिक्षक विद्यार्थ्यांना भेटीची दिनांक सांगतात.
१६) शक्य असेल तर सर्व मुलांना प्रश्नावली उपलब्ध करून देतात किंवा वहीत लिहायला सांगतात.
आवश्यक साहित्य : वही, पेन, पाणी बॉटल, कॅप
शिक्षक कृती :
१) शिक्षक मुख्याध्यापक यांच्या परवानगीने इतर शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना खाऊ गल्लीत घेऊन जातात.
२) हातगाडीवाल्यांना मुलाखतीचे उद्दिष्ट सांगतात.
३) मुलांना गटात प्रश्न विचारायला सांगतात.
४) नोंदी घ्यायला सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेचे पालन करतात.
२) गटात प्रश्नावलीप्रमाणे प्रश्न विचारतात.
३) नोंदी घेतात.
(या उपक्रमाची प्रश्नावली सोबत जोडली आहे.)