विद्याप्रवेश | विद्यार्थी कृतीपत्रिका- 6 | पहिली | Vidyapravesh | Vidyarthi Krutipatrika
👇 खालील व्हिडिओ पहा व माहिती समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करा.
विद्यार्थी कृतीपत्रिका- 6 Whatsapp पोस्ट
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशातील सर्व बालकांनी सन २०२६-२७ पर्यंत प्राथमिक स्तरावर पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये प्राप्त करणे हे शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्तीसाठी NIPUN BHARAT हे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित सर्व बालकांसाठी शैक्षणिक वर्षातील पहिले बारा आठवडे म्हणजेच तीन महिने बालकांच्या शाळापूर्व तयारीसाठी 'विद्याप्रवेश' हा कार्यक्रम घेणे निश्चित करण्यात आले आहे.
पूर्व प्राथमिक शिक्षण घेऊन इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणारे बालक औपचारिक शिक्षण प्रक्रियेतील या महत्त्वाच्या टप्प्यावर आता नवनवीन विषय शिकणार असते, नवीन कौशल्य प्राप्त करणार असते. औपचारिक शिक्षण घेण्यापूर्वी बालकाची काही बाबतीत पूर्वतयारी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने औपचारिक शिक्षण प्रक्रियेतील वाचन, लेखन व गणित शिकण्याची त्याची पूर्वतयारी होणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे ही पूर्वतयारी अंगणवाडी किंवा बालवाड्यांमध्ये करून घेतली जाते. पण पहिलीमध्ये येणारी काही बालके बालवाड्यांमधून येतात तर काही बालके असा कोणताच अनुभव न घेता येतात. तसेच अंगणवाडीमध्ये गेलेल्या प्रत्येक बालकाचा या संदर्भातील अध्ययन अनुभव वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे प्रत्येक बालकाची पूर्वतयारी वेगवेगळ्या पातळीवरील असू शकते. अशा वेळी सर्व बालकांची समान पूर्वतयारी करून घेणे बालकांच्या पुढील शिक्षणासाठीचा पाया म्हणून खूप महत्त्वाची असते.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कार्यक्रमाच्या संदर्भाने इयत्ता पहिलीच्या शिक्षकांसाठी 'विद्याप्रवेश (शाळापूर्व तयारी कार्यक्रम) शिक्षक मार्गदर्शिका' राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत विकसित करण्यात आलेली आहे. या मार्गदर्शिकतील नियोजनानुसार शिक्षक विद्यार्थ्यांकडून आठवडानिहाय कृती घेत असताना काही कृतींसाठी उपयोगी ठरतील अशा कृतिपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या कृतिपत्रिका या कृतिपुस्तिकेत देण्यात आलेल्या आहेत. ही कृतिपुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे यातील कृतिपत्रिका वापरू शकेल. या आनंददायी कृर्तीमुळे बालकाला शाळेत नियमितपणे येण्यासाठी व शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
कधीकधी शिक्षक बालकांना यातील काही कृती घरी पूर्ण करण्यासाठी देतील तेव्हा पालकांनीही सदर कृती पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करावी. आपण यासाठी जेवढा वेळ बालकांना दयाल तितकी ती अधिक आनंदी होतील. चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन बालकाला प्राथमिक शाळेतील शिक्षण यशस्वीपणे घेण्यासाठी तयार करूयात. यासाठी आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा !
विद्याप्रवेश
विद्यार्थी कृतीपात्रिका
शाळापूर्व तयारी
#NIPUN_BHARAT
#विद्याप्रवेश
#विद्यार्थी_कृतीपात्रिका
#शाळापूर्व_तयारी
#NIPUN_BHARAT
पहिली विद्यार्थी कृतीपात्रिका
पहिली
Vidyapravesh
Vidyarthi Krutipatrika
विद्याप्रवेश व पटनोंदणी
विद्याप्रवेश पहिली
nipun bharat
निपुण भारत
विद्यार्थी कृतीपुस्तिका
इयत्ता पहिली अभ्यास
marathi
vidyapravesh
vidya pravesh
vidyapravesh v patanondani
विद्यार्थी कृतीपात्रिका
Krutipatrika