खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-उपक्रम 1 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
खेळ क्रमांक : १
खेळ क्रमांक : २
👇विद्यार्थ्यांना पाठवा व्हॉटसअप पोस्ट-
कृती - (खेळ क्रमांक : १)
• शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करतात.
• शिक्षक एका हाताने WINNER (VICTORY) आणि दुसऱ्या हाताने OK असे चिन्ह करून दाखवतात.
• पहिल्यांदा उजव्या हाताने OK चे चिन्ह आणि डाव्या हाताने WINNER चे चिन्ह दाखवतात.
• नंतर डाव्या हाताने OK आणि उजव्या हाताने WINNER चे चिन्ह दाखवतात.
• तयार आहात ......सुरू करू या... लेट्स स्टार्ट....
• OK....WINNER... OK.... WINNER... OK.... WINNER...
• अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून पाच वेळा सराव करून घेतात.
• प्रथमतः ज्या हाताने OK चे चिन्ह दाखवले आहे दुसऱ्या वेळेस त्या हाताने WINNER चे चिन्ह दाखवतात आणि प्रथमतः ज्या हाताने WINNER चे चिन्ह दाखवलेले आहे त्या हाताने OK चे चिन्ह दाखवतात.
• विद्यार्थ्यांकडून पुन्हा-पुन्हा कृती करून भरपूर सराव करून घेतात.
• याचबरोबर जोडी जोडीने सराव करायला सांगतात.
• सरावानंतर समोर येऊन गटाने सादरीकरण करायला सांगतात.
कृती - (खेळ क्रमांक : २)
• विद्यार्थी शिक्षकांच्या कृतींचे निरीक्षण करतात.
• शिक्षकांनी उच्चारलेल्या अंकानुसार उजव्या हाताने संख्येएवढी बोटे, डाव्या तर्जनीने दर्शक कृती, डाव्या हाताची बोटे आणि उजव्या हाताच्या तर्जनीने दर्शक अशी सुरुवातीला हळुवार आणि नंतर वेगाने कृती करतात. गटाने सादरीकरण करतात.
• मनोरंजनाबरोबर कृतीच्या सारखेपणावर भर देतात.