पद्मासन | प्राणायाम/योग/ध्यानधारणा/श्वसनाची तंत्रे | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
२) प्राणायाम/योग/ध्यानधारणा/श्वसनाची तंत्रे
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव :
पद्मासन
व्हिडिओ -
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक पद्मासन संदर्भातील सर्व माहिती मिळवतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती शारीरिक लवचिकता, शारीरिक स्नायूंचा विकास, स्नायूंची बळकटी.
आवश्यक साहित्य : योगासन पट्टी
शिक्षक कृती :
१) शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पद्मासन या व्यायाम प्रकाराच्या कृती / पायऱ्या प्रत्यक्ष करून दाखवतात.
जमिनीवरील योगासन पट्टीवर पाय सरळ समोर ठेवून ताठ बसतात.
उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल किंचित वर उचलून डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात.
डावा पाय वाकवून त्याचे पाऊल थोडे वर उचलून, उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात.
तळहात गुडघ्यांवर पालथे ठेवतात.
पाठीचा कणा ताठ ठेवून दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे ठेवतात किंवा डोळे मिटतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना पद्मासनाचे महत्त्व सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे पद्मासन या व्यायाम प्रकाराच्या कृती / पायऱ्या प्रत्यक्ष करून दाखवतात
• विद्यार्थी जमिनीवरील योगासन पट्टीवर पाय सरळ ठेवून ताठ बसतात.
विदयार्थी उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलून व डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात.
विदयार्थी डावा पाय वाकवून त्याचे पाऊल थोडे वर उचलून, उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात.
तळहात गुडघ्यांवर पालथे ठेवतात.
पाठीचा कणा ताठ ठेवून दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे ठेवतात किंवा डोळे मिटतात.