नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल | आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्त्वे आणि व्यावहारिक कौशल्ये | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
७) आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्त्वे आणि व्यावहारिक कौशल्ये
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल
पूर्वनियोजित कृती : शिक्षक विद्यार्थ्यांना २ प्रकारच्या आपत्ती असतात ते सांगतात.
१) मानवनिर्मित आपत्ती बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, दंगल या मानवनिर्मित आपत्ती.
२) नैसर्गिक आपत्ती: भूकंप, पूर, चक्रीवादळे, ढगफुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत.
आपत्ती व्यवस्थापन व बचाव मॉक ड्रिल यासंबंधी माहिती व व्हिडिओ क्लिप यांचे संकलन करतात.
• शिक्षक विद्यार्थ्यांना खालील घटकांच्या आधारे भूकंप आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती गोळा करण्यास सांगतात.
१) भूकंप म्हणजे काय ?
२) भूकंप झाल्यावर काय करावे?
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: समय सूचकता, अचूकता, धैर्य व साहस
आवश्यक साहित्य : माईक, साऊंड सिस्टिम, मॉक ड्रिल यासंबंधी माहिती व व्हिडिओ क्लिप यांचे संकलन.
शिक्षक कृती :
• पूर्वनियोजित घटकांवर आधारित विद्यार्थ्यांनी संकलित केलेली माहिती विचारतात. जसे -
१) भूकंप म्हणजे काय ?
उत्तर : भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवणे. त्याप्रमाणे प्रात्यक्षिक करून दाखवणे मॉक ड्रिल घेणे. माहिती सांगणे.
२) मॉक ड्रिल म्हणजे काय ?
उत्तर : भूकंप झाल्यावर किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा व इतरांना कशी मदत करावी. इमारत कशी रिकामी करावी याचा सराव करण्याची एक पद्धत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, इमारतीची विद्यमान फायर अलार्म यंत्रणा सक्रिय केली जाते आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याप्रमाणे, जवळच्या उपलब्ध निर्गमनांद्वारे इमारत रिकामी केली जाते.
शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मॉक ड्रिल कसे असते व ते कसे करावे याची माहिती व प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देतात. जसे :
• मॉक ड्रिल : मॉक ड्रिल हा एक नक्कल केलेला व्यायाम किंवा सराव आहे. जो रिअल-टाईम आणीबाणीचे अनुकरण करतो, संभाव्य कमकुवतपणाचे मूल्यांकन करण्यासाठी व्यक्ती आणि शालेय संस्थेला तयार करतो, आगीच्या वेळी आपत्कालीन संकटे हाताळण्यासाठी प्रतिसाद वेळ आणि तयारी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो.
मॉक ड्रिल दरम्यान दिले जाणारे प्रशिक्षण :
१) भूकंप झाल्यावर किंवा आग लागल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देतात.
२) भूकंपात सुरक्षित ठिकाणी उभे राहतात. आग विझवण्याची प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे प्रतिबंधात्मक उपाय सांगतात.
३) भूकंपात सुरक्षित ठिकाणी उभे राहून बचाव करतात. आग लागलेल्या इमारतीतून कशा प्रकारे बाहेर पडावे हे सांगतात.
४) पीडितांना कशा प्रकारे मदत करावी याची माहिती देतात.
५) भूकंपात सुरक्षित ठिकाणी जाणे व प्राण वाचवणे गरजेचे असते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी माती, चिखल, पाणी, ओल्या कपड्यांचा व फायर एकस्टिंग्विशरचा वापर कशा प्रकारे करावा याचे प्रात्यक्षिक दाखवतात.
• यावेळी शिक्षक सहभागी विद्यार्थ्यांना आगीपासून स्वतःचा बचाव करणे, जवळच्या दवाखान्यात संपर्क साधणे आणि औषधोपचार मिळवणे. त्याचप्रमाणे अग्निशमन उपकरणांचा अचूक वापर करणे यासंबंधी प्रशिक्षण देतात.
भूकंप झाल्यावर काय करावे व इमारतीला आग लागल्याचे आढळून आल्यास कोणती खबरदारी घ्यावी. १) घराच्या अंगणात, बाहेर मोकळ्या जागेत उभे राहतात. इमारत रिकामी करताना उत्तर किंवा दक्षिण दिशेच्या जिन्याने उतरून मजला त्वरित रिकामा करावा.
२) लिफ्टचा वापर टाळावा.
३) स्टोअर रूममध्ये जाऊ नये.
४) आरडाओरडा करू नये किंवा इकडे तिकडे पळू नये.
५) स्वतःच्या वस्तू गोळा करण्याचा मोह टाळून, आहे त्या परिस्थितीत इमारतीच्या बाहेर मोकळ्या जागी
येण्याचा प्रयत्न करतात.
५) शिक्षक विद्यार्थ्यांना वरील सर्व माहिती चित्रफितीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने व ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे प्रात्यक्षिकाद्वारे समजावतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी पूर्वनियोजनानुसार शिक्षकांनी ठरवून दिलेल्या घटकावर संकलित केलेली माहिती सांगतात.
२) 'भूकंप ड्रिल' या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी दिलेली माहिती विद्यार्थी काळजीपूर्वक श्रवण करतात व घेतलेल्या प्रात्यक्षिकामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
३) शालेय इमारतीमध्ये अथवा कोठेही आग लागलेली असताना कशा प्रकारे स्वसंरक्षण व इतरांचे रक्षण करावे, आगीचे प्रकार कोणते आहेत, भूकंप झाला तर करावयाच्या उपाययोजना प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देतात. या सर्व बाबींवर शिक्षकांनी दिलेली माहिती व प्रात्यक्षिक विद्यार्थी व्यवस्थित समजून घेतात.
संदर्भ साहित्य : https://youtu.be/pu_j5aATxws?si=QDblDKXW4ekAaW6S