मातकाम मातीची भांडी आणि फळे तयार करूया | कृती व खेळांवर आधारित शिक्षण-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
मातकाम मातीची भांडी आणि फळे तयार करूया | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : मातकाम मातीची भांडी आणि फळे तयार करूया.
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक माती चाळून भिजवून ठेवतात. विद्यार्थ्यांना सोबत हात पुसण्यासाठी कापड, वस्तू तयार करताना आधार म्हणून पुठ्ठ्याचा तुकडा, पाणी घेण्यासाठी छोटे भांडे, जुने वर्तमानपत्र/कागद व दोरा आणायला सांगतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: सर्जनशीलता, कारककौशल्य, सौंदर्यदृष्टी
आवश्यक साहित्य : ओली माती, पाण्यासाठी भांडे, जुने कापड, पुठ्ठ्याचा तुकडा, जुने वर्तमानपत्र/कागद, दोरा.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात. कृतींचे निरीक्षण करण्यासोबत मातीचा, पाण्याचा वापर करण्याची पद्धत, स्वच्छता यांविषयी माहिती देतात. २) जुने वर्तमानपत्र चुरगळून, दाब देऊन, दोरा गुंडाळून फळे/फळभाज्या यांचे आकार तयार करतात.
उदा., वांगी, केळी, गाजर इत्यादी.
३) तयार झालेल्या आकारांवर योग्य प्रमाणात ओली केलेली माती हळुवार लावतात. पाण्याचा वापर करून आकार रेखीव करतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना हे आकार सुकल्यानंतर अॅक्रेलिक / पेस्टल रंगाने रंगवावे याविषयी माहिती सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) पाणी, पुठ्ठ्याचा तुकडा, जुने कापड इत्यादी साहित्य सोबत घेऊन अर्ध गोलाकारात बसतात.
२) जुन्या वर्तमानपत्राचे तुकडे एकमेकांना जोडून आणि त्यावर दोरा गुंडाळून आवडती फळे/फळभाज्या यांचे आकार तयार करतात.
३) तयार झालेल्या आकारांवर ओल्या मातीचा थर हळुवार लावतात. पाण्याचा वापर करून आकार आणखी रेखीव करतात.
४) पुठ्ठ्याच्या तुकड्यावर तयार झालेले आकार सुकायला ठेवतात.
५) जुन्या कापडाच्या तुकड्याने हात, भांडे व जागा स्वच्छ करतात.
६) ४-५ दिवसांनी आकार वाळल्यानंतर ते अॅक्रेलिक / पेस्टल रंगाने रंगवतात.
संदर्भ साहित्य :