विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात आवडती गोष्ट / कथा पुन्हा सांगणे | कथाकथन | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
१५) कथाकथन
उपक्रमाचे नाव : विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात आवडती गोष्ट / कथा पुन्हा सांगणे.
पूर्वनियोजित कृती :
विविध लोककथा, दंतकथा, साहसकथा, विनोदीकथा, रहस्यकथा यांचा संग्रह करतात.
विविध बालसाहित्य यातील कथांचा संग्रह करतात. उदा., बालमित्र, किशोर, चंपक, वयम, छात्र प्रबोधन
विविध कथांचे संवादपट्ट्या तयार करतात.
• कथा सादरीकरणासाठी बाहुलीनाट्य व विविध नकली चेहरे तयार करून ठेवतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : अर्थपूर्ण शब्द, वाक्य, परिच्छेद आणि शब्दउच्चार यांचा योग्य वापर, अभिनय आणि अभिव्यक्त कौशल्ये, आत्मविश्वास, सभाधीटपणा, संवादशैली
आवश्यक साहित्य : कथांचा संग्रह, संवादपट्ट्या, बाहुलीनाट्य (Puppet), नकली चेहरे (Mask)
शिक्षक कृती :
१) शिक्षक विविध लोककथा, दंतकथा, साहसकथा, विनोदीकथा, रहस्यकथा यांचा संग्रह करतात.
२) तसेच विद्यार्थ्यांना विविध बालसाहित्य यातील कथांचा संग्रह करायला सांगतात. उदा. बालमित्र, किशोर, चंपक, वयम, छात्र प्रबोधन
३) एका कथेच्या संवादपट्ट्या तयार करतात.
४) कथा सादरीकरणासाठी बाहुलीनाट्य किंवा विविध नकली चेहरे तयार करून ठेवतात.
५) कथा सादरीकरणासाठी काही मुलांना सोबत घेतात.
६) शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर प्रभावीपणे कथा सादर करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी विविध बालसाहित्य यातील कथांचा संग्रह करतात. उदा. बालमित्र, किशोर, चंपक, वयम, छात्र
प्रबोधन.
२) कथेच्या संवादपट्ट्यांचा सराव करतात.
३) वाचलेली किंवा ऐकलेली आणि आवडती कथा सादर करतात.
४) काही विद्यार्थी बाहुली किंवा नकली चेहरे यांद्वारे कथेचे सादरीकरण करतात.
संदर्भ साहित्य :
१) बालमित्र
२) निवडक किशोर व किशोर मधील कथा ३) चंपक ४) वयम
५) छात्र प्रबोधन ६) चांदोबा ७) राजीव तांबे यांचे कथासंग्रह
८) वर्तमानपत्रामधील बालसाहित्य
९) दिवाळी अंकामधील बालसाहित्य