ज्येष्ठांशी संवाद | सामाजिक बांधीलकी | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
३) सामाजिक बांधीलकी
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : ज्येष्ठांशी संवाद
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने परिसरातील/गावातील/तालुक्यातील/जिल्ह्यातील विविध वृद्धाश्रमे / जेष्ठ नागरिक संघ याबाबत माहिती गोळा करतात.
शिक्षक यादी केलेल्या वृद्धाश्रमांपैकी / जेष्ठ नागरिक संघातील कोणत्या ठिकाणास भेट दयायची आहे किंवा वृद्धाश्रमातील/जेष्ठ नागरिक संघातील कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना शाळेत भेटीसाठी बोलवायचे यासंदर्भात नियोजन करतात. संबंधित ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत पूर्वकल्पना देतात. वृद्धाश्रमातील / जेष्ठ नागरिक संघातील जेष्ठ व्यक्तींच्या प्रवासासाठी अथवा वृद्धाश्रमात/जेष्ठ नागरिक संघात जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करतात व उपक्रमाचा दिवस व वेळ निश्चित करतात.
शिक्षक विद्यार्थ्यांच्या साहाय्याने जेष्ठ नागरिकांच्या भेटीसाठी आवश्यक साहित्याची यादी करतात.
शिक्षक विद्यार्थ्यांशी ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीदरम्यान कोणत्या बाबींची माहिती, माहितीचे निरीक्षण व त्यांना कोणते प्रश्न विचारावे याबाबत चर्चा करतात. चर्चेतून विद्यार्थ्यांच्या मदतीने जेष्ठ नागरिकांशी साधावयाच्या संवादाची प्रश्नावली तयार करून घेतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- निरीक्षण, संप्रेषण, सहकार्य, सामाजिक बांधीलकी, संवेदनशीलता आवश्यक साहित्य : प्रश्नावली, पेन इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील / गावातील / तालुक्यातील / जिल्ह्यातील वृद्धाश्रमांची/जेष्ठ नागरिक संघाची माहिती देतात.
२) शिक्षक भेटीसाठी ठरवलेल्या वृद्धाश्रमामध्ये जेष्ठ नागरिक संघातील शाळेत बोलविलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कसे वागावे याबाबत सूचना देतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीसाठी घेऊन जातात. किंवा ज्येष्ठ नागरिकांना शाळेत बोलावतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना चर्चेतून तयार केलेल्या प्रश्नावलीच्या साहाय्याने जेष्ठ नागरिकांविषयी माहिती घेण्यास सांगतात.
५) शिक्षक ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीदरम्यान विदयार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात व आवश्यकतेनुसार मदत करतात.
६) भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून चर्चा (प्रश्नोत्तरे, गप्पागोष्टी) करतात.
प्रश्न : १) ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना कसे वाटले? त्याचे अनुभव ऐकताना तुम्हांला काय वाटले ? त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला काय शिकायला मिळाले?
२) ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्हांला काय करायला आवडेल?
३) ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यानंतर तुम्हांला कोणती प्रेरणा मिळाली? तुमच्या घरातील वृद्धांच्या भावना तुम्हाला समजल्या का? इत्यादी
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीदरम्यान अथवा शाळेत बोलविल्यानंतर शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात.
२) विद्यार्थी प्रश्नावलीच्या साहाय्याने आवश्यक माहिती संकलित करतात.
३) विद्यार्थी वृद्धाश्रमास भेट देताना सुरक्षेचे नियम पाळून ज्येष्ठ नागरिकांशी भेट व संवाद पूर्ण करतात.
४) विद्यार्थी या भेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.
५) विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना जाणवलेल्या संवेदनांबद्दल अभिव्यक्त होतात.
संदर्भ साहित्य :
१) 'नटसम्राट' नाटकातील काही संवाद