प्रथमोपचार पेटी तयार करणे | आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्त्वे आणि व्यावहारिक प्रशिक्षण | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
७) आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्त्वे आणि व्यावहारिक प्रशिक्षण
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव: प्रथमोपचार पेटी तयार करणे.
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक प्रथमोपचार पेटी, औषधे इत्यादींची माहिती करून देतात.
विकसित होणारी कौशल्ये- फलनिष्पत्ती प्रथमोपचार पेटीचा गरजेनुसार उपयोग, निरीक्षण कौशल्य.
आवश्यक साहित्य : बँडेज पट्ट्या, सुई, दोरा
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटीचे महत्त्व थोडक्यात सांगतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे विविध उदाहरणाद्वारे सांगतात.
३) शिक्षक प्रथमोपचार पेटीत कोणती औषधे असावीत याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून यादी अंतिम करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांकडून प्रथमोपचार पेटीचे महत्त्व समजून घेतात.
२) विद्यार्थी शिक्षकांकडून प्रथमोपचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे समजून घेतात.
३) विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने प्रथमोपचार पेटीत औषधांची यादी बनवतात.
संदर्भ साहित्य :
१) प्रथमोपचार पेटी संदर्भीय दूरदर्शन (जम्मू) व्हिडिओ.