समजू शकत असाल तर समजून घ्या ! | समता | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
९) समता
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : समजू शकत असाल तर समजून घ्या !
पूर्वनियोजित कृती : शिक्षक विद्यार्थ्यांना शनिवारच्या पहिल्या तासिकेमध्ये आपणास काही खेळ घ्यायचे आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य सोबत घेऊन या, अशी सूचना देतात.
आवश्यक साहित्य : डोळे बांधण्यासाठी कापड, चारही बाजूंना रेषा मारलेला साधा कागद, त्या कागदावर काढलेली आकृती, पेन्सिल, रंग, पेन इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात आणि वर्गातील एका विद्यार्थ्याचा एक हात पाठीमागे दोरीने बांधतात आणि दुसऱ्या हातामध्ये खडू देऊन फलकाजवळ बोलवतात आणि डोळ्यांवर पट्टी बांधून फलकावर काढलेल्या अर्धवट टेबलाला खडूने पाय काढ अशी सूचना देतात.
२) फलकावरील/वहीवरील अशी अनेक अर्धवट चित्रे पूर्ण करण्यास सांगतात. शिक्षक ज्या पद्धतीने सूचना देतात, त्याप्रमाणे विद्यार्थी कृती करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे फलकावर असलेल्या अर्धवट चित्राला डोळ्यांवर पट्टी बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
२) फलकावर किंवा वहीवर काढलेल्या टेबलाच्या अर्धवट चित्राचे पाय काढणे, हत्तीला शेपूट काढणे इत्यादी.
३) या सर्व कृतीनंतर शिक्षक मुलांसोबत गप्पा मारतात. त्यामध्ये ते विद्यार्थ्यांना आलेले अनुभव विचारतात. तुम्हांला जर दृष्टी राहिली नसती, तर तुम्ही ही कामे करू शकला असतात का? अशाच प्रकारचे प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात आणि विद्यार्थी त्यावर बोलतात आणि आपली मते व्यक्त करतात.
संदर्भ साहित्य :
१) यूट्यूबवरील व्हिडिओ क्लिप.