कौन बनेगा स्मार्ट बॉय/गर्ल | आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
९) आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना
उपक्रम क्रमांक: १
उपक्रमाचे नाव: कौन बनेगा स्मार्ट बॉय/गर्ल
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी या विषयाची माहिती घेतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे कौशल्य.
आवश्यक साहित्य : तयार केलेला मुकुट, विजेता रिबीन
शिक्षक कृती :
१) सर्वप्रथम शिक्षक हे 'स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल' हा उपक्रम शाळेत राबवित असताना विद्यार्थ्यांना हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये कसा राबविला जाणार आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतात.
२) त्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक नियम सांगतात. विजेत्या स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल यांना बक्षीस स्वरूपात मुकुट व विजेता रिबीन बक्षीस म्हणून मिळणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगतात.
३) शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे फायदे सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे सांगतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकासाचा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे सांगतात.
विद्यार्थी कृती :
१) 'स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल' या उपक्रमात विद्यार्थी हे शिक्षकांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता, टापटीपपणा व इतर नियमांची स्पर्धात्मक अंमलबजावणी करून या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात व केवळ स्पर्धा म्हणून किंवा बक्षीस म्हणून सहभाग न नोंदवता प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल आवड निर्माण होऊन, प्रत्यक्ष कृतीमध्ये बदल होतो आणि स्वतः मध्ये देखील बदल करतात व इतरांना देखील प्रेरित करतात.
२) विद्यार्थी शिक्षकांकडून वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व व फायदे समजून घेतात. विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे समजतात.
३) विद्यार्थी शिक्षकांकडून वैयक्तिक विकासाचा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे समजून घेतात.
संदर्भ साहित्य :
१) व्हिडिओ. https://youtu.be/MJO7E99X4E
2) Incredible India - 'Swacchta Hi Sewa' Film | Cleanliness Campaign
Nice activity
ReplyDelete