घरकामात मदत | लिंग समभाव | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
१८) लिंग समभाव
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : घरकामात मदत
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक शुक्रवारी शेवटच्या तासाला विदयार्थ्यांना 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत आपण एक छानसा उपक्रम घेणार आहोत हे सांगतात.
तुम्ही घरी जाऊन आपल्या भावंडांच्या मदतीने दादा/बाबा/आजोबा/ताई/आई/आजी यांच्या करावयाच्या कामांची माहिती करून घेण्यास सांगतात. विदयार्थी घरी गेल्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने होणारी कामे कोणती? व आईची कामे कोणती हे शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार तोंडी यादी करतात.
मुले कामाची वर्गवारी घेऊन वर्गात आल्यानंतर, शनिवारच्या पहिल्या तासालाच शिक्षक वर्गातील मुलांचे गट करून परस्परात चर्चा करावयास सांगतात. शिक्षकही चर्चेत सहभागी होतात.
विकसित होणारी कौशल्ये- लिंगसमभाव, समानता मूल्यांची रुजवणूक, चिकित्सक पद्धतीने वर्गीकरण, गटअध्ययनाचे कौशल्य, संभाषण कौशल्य.
आवश्यक साहित्य : घरकामाची रंगवलेली चित्रे, ड्रॉइंग शीट, जलरंग (वॉटर कलर), पेन्सिल, खोडरबर, कार्डशिट इत्यादी.
शिक्षक कृती :
१) मुलांच्या चर्चेत प्रत्यक्ष शिक्षक सहभागी होऊन मुलांबरोबर चर्चा करतात.
२) प्रत्यक्ष मुलांकडून आलेल्या तोंडी यादीतील कामांची विभागणी करतात. त्यात घरात केली जाणारी कामे कोणती? यावर चर्चा करतात.
३) सर्व कामे श्रेष्ठ असतात. स्त्री-पुरुष असा कामात भेदभाव करू नये असे शिक्षक विद्यार्थ्यांना समजावतात. कामाची चित्रे यादी धान्य निवडणे, भाजी निवडणे, पाणी भरणे भांडी घासणे, स्वयंपाक करणे, दुकानला जाणे, इस्त्री करणे, घरातील वडीलधाऱ्या आजारी व्यक्तीस औषधे देणे, झाडून काढणे, अंगण सारवणे इत्यादी.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी घरून येताना विविध कामांची यादी व त्यांची वर्गवारी याची आपापसात चर्चा करतात व शिक्षकांनी सांगितलेल्या कामांच्या यादीतील कामे कोणकोण करतात ते सांगतात,
संदर्भ साहित्य :