मी काय करतो/करते? | विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअरविषयक मार्गदर्शन | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
१४) विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअरविषयक मार्गदर्शन
उपक्रम क्रमांक : १
कृतीचे नाव: मी काय करतो/करते?
पूर्वनियोजित कृती :
शिक्षक विविध व्यवसाय करणाऱ्या कारागीरांच्या, व्यावसायिकांच्या कार्याची (प्लंबर, स्वच्छता कर्मचारी, मूर्तिकार, चित्रकार, शिल्पकार, दुकानदार, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील याप्रमाणे) माहिती गोळा करतात.
शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडत्या व्यवसायाबाबत पालक, मोठे बहिणभाऊ यांच्या मदतीने खालील घटकांबाबत माहिती गोळा करण्यास सांगतात,
• शिक्षक विद्यार्थ्यांना आवडणा-या व्यावसायिकाची वेशभूषा करून येण्यास व त्याबाबत वरील घटकानुसार ५ मिनिटे सादरीकरण करायचे आहे याबाबत सांगतात.
परिसरात उपलब्ध नसलेल्या (उदा., शहरी भागात शेतकरी) व्यावसायिकाच्या कार्याबाबत आंतरजालावरील उपलब्ध व्हिडिओ गोळा करून आवश्यकतेप्रमाणे विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी साहित्य (व्हिडिओ लिंक, प्रोजेक्टर इत्यादी आधीच उपलब्ध करून ठेवतात.)
१) तुम्हाला आवडणारा व्यवसाय कोणता?
२) हा व्यवसाय का आवडतो.
३) सादरीकरण करत असलेल्या व्यवसायाचे नाव.
४) तुमच्या परिसरात हा व्यावसायिक कोठे राहतो? (उदा., शाळेजवळ, घराजवळ)
५) व्यवसायाची वेळ.
६) व्यवसायासाठी वेगळा पोशाख लागतो का?
७) व्यवसायाच्या ठिकाणाला काही वेगळे नाव आहे का? (मोकळी जागा, दुकान, शेती, शाळा इत्यादी.)
८) व्यवसायासाठी काय साहित्य लागते.
९) व्यावसायिकांमुळे समाजात काय योगदान मिळते. (उदा., शेती केल्याने अन्नध्यान्य मिळते, डॉक्टरांमुळे रोगांवर उपचार होतात याप्रमाणे.)
१०) तुम्हाला मोठे होऊन कोणता व्यवसाय करायला आवडेल/कोण व्हायला आवडेल?
विकसित होणारी कौशल्ये- नवनिर्मिती, कल्पकता, प्रश्न, संभाषण, सादरीकरण
आवश्यक साहित्य : शिक्षकांना व्हिडिओ दाखविण्यासाठी व्हिडिओ लिंक, प्रक्षेपक इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांच्या हजेरी क्रमांकाप्रमाणे त्यांनी पेहराव केलेल्या व्यावसायिकांचे सादरीकरण करण्यास सांगतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना नियोजनाप्रमाणे सादरीकरणासाठी काही मिनिटे देतात.
३) दिलेल्या घटकातील मुद्दा विद्यार्थी/विद्यार्थिनी विसरला / विसरली तर तेथे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून घटकाबाबत माहिती देतात. (उदा., व्यावसायिक कोठे काम करतो.)
४) परिसरात उपलब्ध नसलेल्या (उदा., शहरी भागात शेतकरी) व्यावसायिकांच्या कार्याबाबत व्हिडिओ आवश्यकतेप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवतात,
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांनी ठरवून दिलेल्या क्रमाप्रमाणे त्यांनी पेहराव केलेल्या व्यावसायिकांचे सादरीकरण करतात.
२) विद्यार्थी नियोजनाप्रमाणे ५ मिनिटे सादरीकरण करतात.
३) दिलेल्या घटकातील मुद्दा सादरीकरण करणारा एखादा विद्यार्थी/विद्यार्थिनी विसरला/विसरली तेथे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यावर त्याचे समुहात उत्तर देतात. (उदा., हा व्यावसायिक कोठे काम करतो? शेतात) ) शिक्षकांनी परिसरात उपलब्ध नसलेल्या (उदा., शहरी भागात शेतकरी) या व्यावसायिकाच्या कार्याबाबत
४ दाखवलेल्या व्हिडिओचे निरीक्षण करतात, प्रश्न विचारतात, समजून घेतात. (उदा., व्हिडिओतील शेती अवजाराला काय म्हणतात ?)
संदर्भ साहित्य :
१) व्हिडिओ लिंक