वर्ग मंत्रिमंडळ स्थापना | सांविधानिक मूल्यांची रुजवणूक | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
१३) सांविधानिक मूल्यांची रुजवणूक
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव: वर्ग मंत्रिमंडळ स्थापना
उद्देश :
१) निवडणूक प्रक्रियेची ओळख होणे.
२) निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे.
३) वर्ग मंत्रिमंडळात सहभागी होऊन प्रत्यक्ष वर्ग प्रशासनात भाग घेणे.
पूर्वनियोजित कृती :
१) वाचन सराव घेणे
२) ध्वनिप्रक्षेपक सुविधेचा वापर करून विदयार्थ्यांचे सामूहिक अनुवाचन घेणे.
विकसित होणारी कौशल्ये - भारतीय संविधानाप्रति जागरूकता निर्माण होते.
आवश्यक साहित्य : ध्वनिप्रक्षेपक, पाठ्यपुस्तक.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी प्राथमिक माहिती सांगतात.
२) मंत्रिमंडळ व त्याची आवश्यकता याविषयी मुलांसोबत चर्चा करतात.
३) वर्ग मंत्रिमंडळाची स्थापना करून मुलांना निवडणूक प्रक्रिया व वर्ग प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव देतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी वर्गाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात.
२) विद्यार्थी वर्ग मंत्रिमंडळात सहभागी होतात.
३) सोपवलेल्या जबाबदारीनुसार वर्गाचे कामकाज पाहतात.