माझी दिनचर्या | व्यक्तिमत्त्व विकास (माझे आरोग्य) | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
५) व्यक्तिमत्त्व विकास (माझे आरोग्य)
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव: माझी दिनचर्या
पूर्वनियोजित कृती: विद्यार्थ्यांना विचारावयाच्या प्रश्नांची यादी करतात.
जसे :
तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
त्यानंतर तुम्ही काय-काय करता?
घड्याळातील वेळ पाहून त्यावेळी तुम्ही काय करत असता ते सांगा? (उदा., सकाळी ९.०० वा., दुपारी २.०० वा. इत्यादी.)
दिनचर्या दर्शविणारी चित्रे गोळा करतात. तक्ता तयार करतात. त्यापैकी काही चित्रे ही आदर्श दिनचर्येशी सुसंगत नसणारी देखील असावीत.
विकसित होणारी कौशल्ये- निरीक्षण, संभाषण, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्त्व विकास. आवश्यक साहित्य : दिनचर्याविषयक कार्ड्स किंवा तक्ते.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना चित्रतक्ता दाखवून त्याविषयी वरील नमुनात्मक प्रश्न विचारतात.
२) विद्यार्थ्यांच्या दिनचर्येविषयी प्रहरानुसार (सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र) विचारतात.
३) घड्याळात वेळ दाखवून (उदा., सकाळी ९ वा.) या वेळी तुम्ही काय करता है विचारतात.
४) आदर्श दिनचर्येविषयी विद्यार्थ्यांशी खालील मुद्दयांच्या आधारे चर्चा करतात.
उठण्याची वेळ, न्याहरीची वेळ, जेवणाची वेळ, खेळण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ. ६) ज्या विद्यार्थ्यांची दिनचर्या आरोग्यदायी नाही त्यांच्याशी स्वतः संवाद साधून मार्गदर्शन करतात.
७) 'लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे'
'Early to bed, Early to rise, makes you healthy, wealthy and wise' या सुभाषितावर चर्चा करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी किती वाजता उठतात हे सांगतात.
२) विदयार्थी त्यांच्या दिनचर्येविषयी सांगतात. (सकाळी उठणे, दात घासणे ... इत्यादी.)
३) घड्याळात वेळ (स. ९.०० वा) पाहून यावेळी आम्ही काय करतो हे सांगतात. (न्याहरी करणे.)
४) आदर्श दिनचर्येविषयी चर्चेत सहभागी होतात.
(वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, वेळेवर जेवण करणे, आहारात भाज्यांचा समावेश करणे,....... इत्यादी)
५) दिनचर्या आदर्श असेल, तर शारीरिक विकास, मानसिक विकास आणि बौद्धिक विकास उत्तम होतो हे समजून घेतात.
विद्यार्थी दिनचर्या दर्शविणाऱ्या चित्रांचे निरीक्षण करतात. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. जसे -
१) चित्रात काय दिसत आहे?
२) तुम्ही किती वाजता उठता?
३) संध्याकाळी ६ वाजता तुम्ही काय करत असता?
संदर्भ साहित्य :
१) इयत्ता पहिली : खेळू करू शिकू पुस्तिका