ओळख नाणी-नोटांची | दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन आणि व्यावहारिक कौशल्ये | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
८) दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन आणि व्यावहारिक कौशल्ये
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : ओळख नाणी-नोटांची
पूर्वनियोजन कृती :
• शिक्षक विविध नाणी व नोटा यांचा संग्रह करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: निरीक्षण कौशल्य, भारतीय चलन ओळखण्याचे कौशल्य, संख्याज्ञान
आवश्यक साहित्य : नाणी, नोटा
शिक्षक कृती :
१) शिक्षक सर्वप्रथम विदयार्थ्यांना नाणी व नोटा दाखवतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्त्व सांगतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारा व्यवहार दाखवितात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांकडून दाखवलेल्या नाणी व नोटा पाहतात.
२) विद्यार्थी शिक्षकांकडून भारतीय चलनाचे महत्त्व समजून घेतात.
३) विदयार्थी शिक्षकांकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतात.
संदर्भ साहित्य :
१) संदर्भ व्हिडिओ https://youtube.com/shorts/QOJ99oNptTk?si=55Z5V1ARwqt6d12v