फायरलेस कुकिंग | विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअरविषयक मार्गदर्शन | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
१४) विविध व्यवसायांचा परिचय आणि करिअरविषयक मार्गदर्शन
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : फायरलेस कुकिंग
पूर्वनियोजित कृती :
• शाळेत कोणकोणते पदार्थ विस्तव / शेगडीशिवाय करता येतात याबाबत पदार्थांचे वेगळे प्रकार उदा. कच्चा चिवडा, दडपे पोहे, चटणी, ठेचा, फुटसॅलेड, व्हेजिटेबल सॅलेड इत्यादीबाबत घटक, पाककृती याबाबत माहिती गोळा करतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शेगडीशिवाय स्वयंपाक पोह्यांचा कच्चा चिवडा या पाककृतीसाठी लागणाऱ्या पदार्थात कोणते पोषक घटक असतात. याबाबत पालक, मोठे बहीणभाऊ यांच्या मदतीने खालील घटकाबाबत माहिती गोळा करण्यास सांगतात तसेच शनिवारी आणावयास सांगतात.
१) पोहे
२) चुरमुरे
३) शेंगदाणे
४) खोबरे
५) खाण्याचे तेल
६) तिखट
७) मीठ
८) साखर
९) लिंबू
१०) कोथिंबीर
११) कांदा/कांदयाची पात
१२) डाळे
शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांना कोणता घटक आणणे शक्य होणार आहे हे विचारून त्याचे प्रमाण किती असायला हवे याबाबत सांगतात. शालेय पोषणआहार किंवा शाळा/आचारी यांच्याकडून सदर पाककृती करण्यासाठी मोठे पातेले, चमचा, प्लेट्स यांची व्यवस्था आधीच उपलब्ध करून ठेवतात.
विकसित होणारी कौशल्ये- पाककौशल्य, कल्पकता, जीवनकौशल्य
आवश्यक साहित्य : पोहे, चुरमुरे, शेंगदाणे, खोबरे, खाण्याचे तेल, तिखट, मीठ, साखर, लिंबू, कोथिंबीर, कांदा/कांद्याची पात, मोठे पातेले, चमचा, प्लेट्स इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथम पोहे, कुरमुरे पातेल्यात टाकण्यास सांगतात.
२) त्यानंतर पातेल्यात डाळे, शेंगदाणे, खोबरे टाकण्यास सांगतात.
३) यावर तिखट, मीठ, साखर हे जिन्नस विद्यार्थ्यांना टाकण्यास सांगतात.
४) शालेय पोषणआहारातील मावशी / ताईंकडून कांदा चिरून घेतात व तो यावर टाकण्यास सांगतात.
५) यावर तेल टाकण्यास सांगून हे मिश्रण चमच्याने ढवळून एकत्रित करतात.
६) यावर लिंबू पिळून वर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकतात.
७) विद्यार्थ्यांनी आणलेल्या घटकातील पोषण घटक कोणते हे विचारतात.
८) चिवडा झाल्यावर विद्यार्थ्यांना वाटून स्वतःही आस्वाद घेतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांनी ठरवून दिलेल्याप्रमाणे खाद्यघटक आणतात.
२) खादयघटकात कोणते पोषक घटक आहे याबाबत माहिती गोळा करतात. खालीलप्रमाणे सांगतात. जाणून घेतात.
(पोहे - कर्बोदके, कुरमुरे कर्बोदके, पोटॅशिअम, शेंगदाणे प्रथिने, डाळे विटामिन बी, खोबरे- कॅल्शिअम, कोथिंबीर विटामिन सी)
३) शिक्षकांनी सांगितलेल्या क्रमाने खाद्यघटक पातेल्यात टाकतात.
४) शिक्षक करत असलेल्या पाककृतीचे निरीक्षण करतात.
५) पाककृतीचा आस्वाद घेतात.
संदर्भ साहित्य :
व्हिडिओ लिंक
१) https://youtu.be/TCilyCDwqT0?si=wOhtqrmzN8uWyV6U
२) https://youtube.com/shorts/mZQ9s_tLFPU?si=B7AiPFmUJxxb4KpA