किराणा दुकान भेट (परिसर ओळख) | क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती-1 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
१२) क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : किराणा दुकान भेट (परिसर ओळख)
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक परिसरातील किराणा दुकानाबाबत माहिती गोळा करतात,
शिक्षक परिसरात उपलब्ध किराणा दुकानाला केव्हा, कुठे व कशी भेट दयायची याचे नियोजन करतात. संबंधित व्यक्तींना व पालकांना याची पूर्वकल्पना देतात.
• शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन करण्याची सूचना देतात. विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची सूचना देतात. उदा., पाण्याची बाटली ठेवणे, रांगेत चालणे इत्यादी सूचना.
शिक्षक विदयार्थ्यांना क्षेत्रभेटी दरम्यान कोणत्या बाबींची माहिती घ्यावी किंवा निरीक्षण करावे याबाबत सविस्तर पूर्वसूचना देतात. खालील प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करण्यास सांगतात.
प्रश्न
: १) किराणा दुकानाचे नाव काय आहे?
२) किराणा दुकान कोठे आहे.
३) दुकानाची वेळ काय आहे?
४) दुकानात विक्रीसाठी काय काय असते?
५) दुकानात कोणकोणत्या वस्तूवर छापील किंमत असते.
६) दुकानात कामगार किती आहेत ?
क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारे (प्रश्नोत्तरे, गप्पागोष्टी) चर्चा करणार हे ठरवतात. विकसित होणारी कौशल्ये निरीक्षण, संप्रेषण, सामाजिक बांधीलकी, व्यावसायिक कौशल्ये, सहकार्य इ.
आवश्यक साहित्य : पाण्याची बाटली, डबा इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील किराणा दुकानांची नावे विचारतात.
२) परिसरातील किराणा दुकानाला भेट देण्यासाठी विदयार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतात. (उदा., एका रांगेत चला, स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी.)
३) शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्रभेटीवेळी पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात.
४) क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विदयार्थ्यांना खालील स्वरूपाचे प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. उदा..
प्रश्न :
१) किराणा दुकानात तुम्ही काय काय पाहिले?
२) किराणा दुकानात यापूर्वी गेला होतात का?
३) दुकानात तुमच्या आवडीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या?
४) दुकानात कोणकोणत्या वस्तूंवर छापील किंमत होती?
५) दुकानाला भेट देऊन तुम्हाला कोणते अनुभव आले. इत्यादी
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या किराणा दुकानाचे नाव सांगतात.
२) विद्यार्थी क्षेत्रभेटी दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात.
३) विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या किराणा दुकानाची माहिती सादर करतात.
४) विद्यार्थी क्षेत्रभेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात.
अशा प्रकारे बाजार/गोठा/दूध डेअरी/बाग इत्यादी स्थळांना क्षेत्रभेट देता येईल.
संदर्भ साहित्य :