माझे संविधान माझा अभिमान | सांविधानिक मूल्यांची रुजवणूक | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
१३) सांविधानिक मूल्यांची रुजवणूक
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : 'माझे संविधान माझा अभिमान' भारतीय संविधान 'उद्देशिका' सामूहिक वाचन करणे. उद्देश : भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची ओळख होणे.
पूर्वनियोजित कृती :
• वाचन सराव घेणे.
ध्वनिप्रक्षेपक सुविधेचा वापर करून विद्यार्थ्यांचे सामूहिक अनुवाचन घेणे.
विकसित होणारी कौशल्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण होते.
आवश्यक साहित्य : 'ध्वनिप्रक्षेपक', 'संविधान उद्देशिका'.
शिक्षक कृती :
१) शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी प्राथमिक माहिती सांगतात.
२) शिक्षक भारतीय संविधान उद्देशिकेमधील महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ सांगतात.
३) भारतीय संविधान 'उद्देशिका' अनुवाचन करतात. सदर उपक्रम परिपाठावेळी नियमित घेतात.
२६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिन' साजरा करतात.
विद्यार्थी कृती :
१) विदयार्थी वर्गामध्ये भारतीय संविधान 'उद्देशिका'चे सामूहिक वाचन करतात.
२) २६ नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 'संविधान दिन' साजरा करतात.
संदर्भ साहित्य :
१) भारतीय संविधान प्रदर्शनी फलक
२) भारतीय संविधान म्हणत असतानाचे विविध व्हिडिओ.
C
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.