वेशभूषा स्पर्धा (Fancy dress competition) | पर्यावरण संवर्धन-2 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक: २
उपक्रमाचे नाव : वेशभूषा स्पर्धा (Fancy dress competition)
पूर्वनियोजित कृती :
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या परिसरातील सजीव व निर्जीव घटक याबाबत माहिती होण्यासाठी वेशभूषा स्पर्धा (Fancy dress competition) आयोजित करतात. यासाठी पुढील थीम देतात.
१) प्राणी जंगली प्राणी, पाळीव प्राणी, कीटक, जलचर इत्यादी.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती निरीक्षण, संवेदनशीलता, नेतृत्व गुण, संप्रेषण कौशल्य, सर्जनशीलता इत्यादी.
आवश्यक साहित्य : वेशभूषेसाठी आवश्यक साहित्य, सादरीकरणासाठी आवश्यक साहित्य.
शिक्षक कृती :
१) शिक्षक वेशभूषा स्पर्धा (Fancy dress competition) घेण्यासाठी नियोजन करतात.
२) आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे नियम आणि कार्यवाहीची पद्धत निश्चित करतात.
३) शिक्षक वेशभूषा स्पर्धेतील सहभागी विदयार्थ्यांनी आपण निवडलेल्या प्राणी जंगली प्राणी, पाळीव प्राणी, कीटक, जलचर या थीमवर आधारित वेशभूषा आणि त्यासंबंधी माहिती सादर करावयाच्या सूचना विद्यार्थ्यांना देतात.
४) मी कोण आहे? माझी उपयुक्तता काय? मी कोठे राहतो? माझे अन्न कोणते? माझे वैशिष्ट्य काय?
या पाच प्रश्नांवर आधारित माहिती सादरीकरण करण्यासंबंधी सूचना देतात.
५) दिलेल्या सुचनेप्रमाणे विदयार्थ्यांना घरी पूर्वतयारी करण्यास सांगून तयारीसाठी पुरेसा कालावधी देतात.
६) वेशभूषा सादरीकरण आणि ५ वाक्ये माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून शिक्षक मूल्यमापन करतात.
विद्यार्थी कृती :
१) विदयार्थी वेशभूषा (Fancy dress competition) स्पर्धेमध्ये दिलेल्या विषयानुसार सहभागी होतात.
२) विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊन माहिती सादरीकरण करतात.
संदर्भ साहित्य : इंटरनेट, वर्तमानपत्रामधील कात्रणे, माहिती पुस्तिका इत्यादी.
वरील कृतीप्रमाणेच खालील विषयांवर वेशभूषा स्पर्धा आयोजित करता येऊ शकेल.
१) वनस्पती औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे इत्यादी.
२) सूर्यमालेतील ग्रह, तारे इत्यादी.