Google translate चा वापर करू व इंग्रजी शिकू | संगणकाची ओळख-2 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : Google translate चा वापर करू व इंग्रजी शिकू...
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक संगणकाचे व इंटरनेटचे उपयोग विद्यार्थ्यांना सांगतात.
संगणक व इंटरनेटचे उपयोग :
• माहिती संग्रहित करणे, पुनर्प्राप्त करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे. दस्तऐवज टाइप करणे, ई-मेल पाठविणे, गेम खेळणे आणि वेब ब्राउझ करणे. (इंटरनेटवरून माहिती मिळविणे), अभ्यास करणे, धडा समजून घेणे, कविता ऐकणे इत्यादींसाठी संगणक व इंटरनेटचा उपयोग होतो.
• दुसरी भाषा शिकणे, भाषांतर करणे इत्यादींसाठी सुद्धा संगणक व इंटरनेटचा उपयोग होतो.
शिक्षक गुगल ट्रान्सलेशन विषयी माहिती सांगतात.
• Google translate ही एक बहुभाषी तांत्रिक मशीन भाषांतर सेवा आहे. जी Google ने मजकूर, दस्तऐवज आणि वेबसाइट्स एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करण्यासाठी विकसित केली आहे. हे वेबसाइट इंटरफेस, Android आणि IOS साठी मोबाइल अॅप, तसेच एक API (अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) पुरविते जे वापरकर्त्यांना ब्राउझर विस्तार आणि सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यास मदत करते.
गुगल translate चा वापर कशा प्रकारे करावा हे विद्यार्थ्यांना सांगतात.
उदा. संगणक, laptop, मोबाईलवरसुद्धा त्याचा वापर करता येतो.
Google translate चा वापर करून इंग्रजी कशी शिकता येते हे सांगतात.
• मोबाईल किंवा संगणकावर गुगल ट्रान्सलेशन टूल ओपन करतात. यासाठी प्लेस्टोर वरून मोबाइलसाठी Google translate हे अॅप डाऊनलोड करून किंवा वेब ब्राउजर वरून Google translate शोधून त्यामध्ये भाषांतर करण्यासाठी दोन्ही भाषा कशा निवडायच्या हे दाखवितात.
< छोटे, छोटे मराठी शब्द बोलून किंवा किबोर्डचा वापर करून टाईप करणे व ते आपोआप कसे दुसऱ्या भाषेत भाषांतरित होतात हे प्रात्याक्षिक करून दाखवतील.
< शब्दाप्रमाणेच छोट्या वाक्यांचा सराव करून घेतात.
★ तसेच टाईप केलेले लिसन (साऊंड) या चिन्हाचा वापर करून कसे ऐकता येईल याबाबत माहिती करून देतील.
याचा सराव करून घेतात व स्वयं अध्ययन करून कशी इंग्रजी शिकता येईल याची माहिती देतात.
मोबाइलवर Google translate सुरू करणे. त्याची योग्य ती सेटिंग करणे.
या सर्व सेटिंगचा शिक्षक अगोदरच स्वतः सराव करून घेतील.
शिक्षक विदयार्थ्यांना Google translate चा वापरविषयी माहिती सांगणे.
• प्रत्यक्ष भाषांतर करायला लावणे.
• विद्यार्थी सराव.
विकसित होणारी कौशल्ये निरीक्षण, भाषांतर, सृजनकौशल्य, सादरीकरण कौशल्य, विद्यार्थी छोटे-छोटे
इंग्रजी शब्द व वाक्ये भाषांतर करू शकतील. विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढेल. इंग्रजी भाषा शिकण्यास मदत
होईल. आवश्यक साहित्य : मोबाइल, संगणक, प्रक्षेपक साहित्य, इंटरनेट सुविधा, गुगल ट्रान्सलेट अॅप
शिक्षक कृती :
१) शिक्षक संदर्भ साहित्यात नोंदविलेला किंवा त्याच्याशी सुसंगत असा व्हिडिओ दाखवतात.
२) शिक्षक इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ सांगतात. काही इंग्रजी शब्द सांगून विद्यार्थ्यांना त्याचा मराठी अर्थ
विचारतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना मराठी अर्थ माहीत नसल्यास तो मोबाइलवर कसा शोधावा याबाबत मार्गदर्शन करतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाइलवर Google translate ओपन करून सेटिंगची माहिती सांगतात.
५) Google translate मध्ये इंग्रजी शब्द लिहून तो मराठीत कसा बदलतो याची माहिती देतात.
मोबाईल किंवा संगणकावर Google translate सुरू करणे.
भाषांतर करावयाची (मराठी) व ज्यामध्ये भाषांतर होईल (इंग्रजी) भाषा निवडणे.
मराठी भाषेच्या चौकटीत बोलून किंवा लिहून छोटे शब्द किंवा वाक्य टाईप करणे.
भाषांतर झालले साऊंड चिन्हाच्या मदतीने ऐकणे व ते पुन्हा बोलणे.
ही कृती काही विद्यार्थ्यांना करायला लावून त्यांचा सराव करून घेणे.
६) Google translate मध्ये इंग्रजीतून मराठीत व मराठीतून इंग्रजीत कसा बदल करावा हे सांगतात.
७) भाषांतराचा सराव करायला सांगतील.
८) विद्यार्थ्यांचा बोलून लिहिण्याचा व ऐकून बोलण्याचा सराव करून घेतील.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांनी दाखविलेली व्हिडिओ क्लिप लक्षपूर्वक पाहतात. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात.
२) विद्यार्थी मोबाइलवर Google translate कसे ओपन करावे हे समजून घेतात.
३) विद्यार्थी गटनिहाय बसतात, मग Google translate मध्ये इंग्रजी शब्द लिहून तो मराठीत कसा बदलतो याची माहिती ऐकतात व त्याविषयी चर्चा/सराव करतात.
४) विद्यार्थी शिक्षकाच्या मोबाइलमध्ये Google translate ओपन करून इंग्रजी शब्दांचा अर्थ शोधतात.
५) कृतीचे अनुकरण करून झाल्यानंतर दुसरी कृती करतात.
६) भाषांतराचा सराव करतात. (संगणक / लॅपटॉप/मोबाइलच्या मदतीने)
७) शिक्षक सांगतील त्याप्रमाणे सर्व कृती व त्यांचा क्रम लक्षात ठेवतात.
८) सांगितलेल्या क्रमाने कृतींचा सराव करतात.
९) स्वतः भाषांतर करून इंग्रजी शिकण्याचा सराव करतात.
संदर्भ साहित्य :