महाराष्ट्र गीत | Mindfullness वर आधारित कलाविष्कार, स्थानिक कला व संस्कृतीचा परिचय-1 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
११) Mindfullness वर आधारित कलाविष्कार, स्थानिक कला व संस्कृतीचा परिचय
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : महाराष्ट्र गीत
व्हिडिओ :
पूर्वनियोजित कृती :
• शुक्रवारी शेवटच्या तासाला शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती देणे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : आपल्या राज्यातील सामाजिक व कला संस्कृतीचा वारसा माहिती होणे व त्याबद्दल आदर भावना निर्माण होण्यास मदत होणे.
आवश्यक साहित्य :
माईक, म्युझिक सिस्टिम/हार्मोनिअम
शिक्षक कृती :
१) शनिवारी शिक्षक विदयार्थ्यांना वर्गात एकत्र बसवतात. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती व महाराष्ट्र गीत याबद्दल माहिती सांगतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गीत म्हणून दाखवितात व विद्यार्थ्यांकडून ते पाठ करून घेतात. या
अनुषंगाने शिक्षक विदयार्थ्यांना महाराष्ट्राविषयी माहिती सांगतात.
३) शिक्षक महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्म सलोख्याने राहणाऱ्या लोकांची माहिती विद्यार्थ्यांना सांगतात. तालासुरात विदयार्थी महाराष्ट्र गीत कसे गातील याकडे शिक्षक लक्ष देतात.
विद्यार्थी कृती :
१) शिक्षक सांगत असलेली माहिती विद्यार्थी आवडीने ऐकतात व महाराष्ट्र गीताचा सराव करतात, महाराष्ट्र गीत तालासुरात व आनंदाने गातात.