ओरिगामी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भेटकार्ड तयार करणे | Mindfullness वर आधारित कलाविष्कार, स्थानिक कला व संस्कृतीचा परिचय-3 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ३
उपक्रम २ : ओरिगामी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भेटकार्ड तयार करणे.
पूर्वनियोजित कृती: विद्यार्थ्यांना शुक्रवारच्या शेवटच्या तासात दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कला, कार्यानुभवाविषयीच्या तासिकेसंबंधी सूचना देणे. थोडक्यात विषयाची पार्श्वभूमी सांगणे व कृती करण्यासाठी आवश्यक साहित्य लिहून देणे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- निरीक्षण कौशल्य, हस्तकौशल्य.
आवश्यक साहित्य : रंगीत कागद, खळ, कात्री, पट्टी, पेन्सिल, सजावटीचे उपलब्ध साहित्य, रंगीत पेन इत्यादी.
शिक्षक कृती :
१) रंगीत कागद घेऊन शिक्षक मधोमध घडी घालतात.
२) कार्ड तयार करताना शिक्षक विदयार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आकार कापण्यास सांगतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना शुभेच्छा लिहिण्यासाठीच्या कागदावर फिकट रंगाचा किंवा पांढरा कागद चिकटवण्यास सांगतात. त्या त्यावर शुभेच्छा संदेश लिहितात.
४) मुखपृष्ठावर आकर्षक सजावट करण्यासाठी कागदी फुले तयार करून चिकटवतात, सजावटीच्या साहित्याचा वापर करून आकर्षक रंगसंगतीमध्ये सजावट करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचना लक्षपूर्वक ऐकतात व शिक्षकांच्या सूचनेनुसार कृती करतात.