वहीच्या कोऱ्या पानांपासून पॉकेट डायरी तयार करणे | Mindfullness वर आधारित कलाविष्कार, स्थानिक कला व संस्कृतीचा परिचय-4 | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : ४
उपक्रम २ : वहीच्या कोऱ्या पानांपासून पॉकेट डायरी तयार करणे.
पूर्वनियोजित कृती: विद्यार्थ्यांना शुक्रवारच्या शेवटच्या तासिकेत दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कला कार्यानुभवविषयीच्या तासिकेसंबंधी सूचना देणे. थोडक्यात विषयाची पार्श्वभूमी सांगणे व कृती करण्यासाठी आवश्यक साहित्य लिहून देणे.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- निरीक्षण, हस्तकौशल्य
आवश्यक साहित्य : जुन्या वहीची कोरी पाने, रंगीत कागद, खळ, कात्री, पट्टी, पेन्सिल, सजावटीचे उपलब्ध साहित्य, रंगीत पेन इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक सर्वप्रथम जुन्या वहीची कोरी पाने घेऊन मधोमध घडी घालतात.
२) त्यानंतर डायरी तयार करताना विद्यार्थ्यांना आवडेल त्या आकारात डायरी बनवण्यास सांगतात.
३) शिक्षक वहीची कोरी पाने, सुई, दोऱ्याने शिवतात किंवा डिंकाच्या साहाय्याने चिकटवतात.
४) मुखपृष्ठावर आकर्षक सजावट करण्यासाठी कागदी फुले तयार करून चिकटवतात, तसेच सजावटीचे साहित्य यांचा वापर करून आकर्षक रंगसंगतीमध्ये सजावट करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचना लक्षपूर्वक ऐकतात व शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे कृती करतात.
२) विद्यार्थी जुन्या वहीची कोरी पाने घेऊन पॉकेट डायरी तयार करतात व दररोज तिचा वापर शाळेतील अभ्यास लिहिणे किंवा दैनंदिन नोंदी करण्यासाठी करतात.
३) या प्रकारची सुंदर आणि छान अशी आकर्षण पॉकेट डायरी तयार करू शकतात.