नमुना सक्रिय वाचन (Model Active Reading) | वाचनसंस्कृती | इयत्ता तिसरी व पाचवी | आनंददायी शनिवार
१६) वाचनसंस्कृती
उपक्रमाचे नाव : नमुना सक्रिय वाचन (Model Active Reading)
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षकांनी त्याचा पुरेसा सराव करतात. वाचलेल्या मजकुराचे आकलन व्हावे यासाठी काही कृती तयार करतात.
विद्यार्थी आवडीने सहभागी होतील अशा तंत्रांचा वापर करतात. उदा. कथाकथन, भूमिकाभिनय, Reading Relay Activity, Voice Modulation Activity इत्यादी.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: श्रवण, प्रकटवाचन, संभाषण आणि आकलन.
आवश्यक साहित्य : सहज उपलब्ध होणारी चित्ररूप, मनोरंजनात्मक गोष्टींची पुस्तके, मासिके, उदा चांदोबा, किशोर, चंपक, चिकू-पिकू, वयम, ठकठक, Tell me Why, Wisdom, वर्तमानपत्रातील बालसाहित्य इ. मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेतील बालसाहित्य उपलब्ध ठेवावीत.
शिक्षक कृती :
१) शिक्षक एक छोटी मनोरंजक कथा निवडतात. उदा., नीला सत्यनारायण यांच्या 'मैत्र' या पुस्तकामधील कथा - बाहुलीची किंमत.
२) शिक्षक आवाजामध्ये चढ-उतार करत आणि हावभावासहित या कथेचे प्रकटवाचन करतात.
३) त्यानंतर या कथेचे विद्यार्थ्यांकडून प्रकटवाचन करून घेतात.
४) प्रकटवाचनानंतर शिक्षक विद्यार्थ्यांचे गट (४ ते ५ विद्यार्थी) तयार करतात आणि भूमिकाभिनयाद्वारे अथवा वरील सुचविलेल्या तंत्राद्वारे वाचन करून घेतात.
५) शिक्षक विद्यार्थ्यांच्या वाचनाचे निरीक्षण करतात.
६) प्रकटवाचन प्रभावी होण्यासाठी आवश्यक बाबी सुचवतात. उदा., आवाजामधील आरोह-अवरोह, संवादशैली, देहबोली याबाबत उदाहरण देऊन स्पष्ट करतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या प्रकटवाचनाचे निरिक्षण करून लक्षपूर्वक ऐकतात.
२) विद्यार्थी शिक्षकांबरोबर प्रकटवाचन करतात.
३) त्यानंतर गट तयार करून गटामध्ये प्रकटवाचन करतात आणि लक्षपूर्वक ऐकतात.
४) इतर गटांना आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतात.
संदर्भ साहित्य :
१) चांदोबा
२) किशोर
३) चंपक
४) चिकू-पिकू
५) वयम
६) ठकठक
७) Tell me Why
८) Wisdom
९) Read to Me App
१०) StoryWeaver (storyweaver.org.in)
११) StoryWeaver Instagram (instagram.com/pbstoryweaver)
१२) Story Weaver Facebook (facebook.com/pbstoryweaver)
१३) Story Weaver Twitter (twitter.com/pbstoryweaver)
१४) Pratham Books (prathambooks.org)