आधुनिक काळानुरूप रूपांतरण (Modern Adaptations of Stories) | कथाकथन | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
१६) कथाकथन
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : आधुनिक काळानुरूप रूपांतरण (Modern Adaptations of Stories)
पूर्वनियोजित कृती :
• विविध पारंपरिक कथांचा संग्रह
• विविध पारंपरिक कथा यांचे आधुनिक काळात रूपांतर केलेल्या कथांचा संग्रह.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती : भाषिक सर्जनशीलता
कल्पकता, संवादशैली, अभिनय
आवश्यक साहित्य : पारंपरिक कथांची पुस्तके स्वनिर्मित रूपांतरीत केलेली कथा. उदा. तहानलेला कावळा ससा आणि कासव लाकूडतोड्या वगैरे.
शिक्षक कृती :
१) शिक्षक पारंपरिक कथांची पुस्तके निवडून मुलांना उपलब्ध करून देतात.
२) शिक्षक पारंपरिक कथा सादर करतात. उदा., तहानलेला कावळा
एकदा एका कावळ्याला फार तहान लागते. तो पाण्याचा खूप शोध घेतो. पण पाणी काही मिळत नाही. शेवटी त्याला एक भांडे दिसते. त्यात पाणी असते पण त्याची पातळी खाली गेलेली असते. त्याला पाणी काही पिता येत नाही. मग त्याला एक कल्पना सुचते. तो त्या पाण्यात छोटे खडे टाकायला सुरुवात करतो. खडे पडू लागतात तशी पाण्याची पातळी वाढू लागते. असे करता करता पाणी त्याला पिता येईल एवढ्या पातळीपर्यंत आले. त्यानंतर कावळ्याने भरपूर पाणी प्यायले आणि तो निघून गेला. तात्पर्य : प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे.
३) तसेच कथा सादर करताना आवाजाची विविध तंत्रे वापरतात.
४) कथा सादर करताना आधुनिक काळानुसार त्यामध्ये बदल करतात.
उदा. चतुर कावळा
एकदा एका कावळ्याला फार तहान लागते. तो पाण्याचा खूप शोध घेतो. पण पाणी काही मिळत नाही. शेवटी त्याला एक भांडे दिसते. त्यात पाणी असते पण त्याची पातळी खाली गेलेली असते. त्याला पाणी काही पिता येत नाही. तो इकडे तिकडे पाहतो आणि मग त्याला एक कल्पना सुचते. त्याला जवळच वेगवेगळ्या गवताच्या काड्या पडलेल्या दिसतात. त्या काड्यांमध्ये त्याला एक रंगीत स्ट्रॉ दिसतो. तो उडत तेथे जातो आणि इकडे तिकडे पाहतो. क्षणाचा विलंब न करता तो स्ट्रॉ चोचीमध्ये पकडतो. त्यानंतर घाईघाईने तो भांड्याकडे येतो आणि स्ट्रॉ त्या भांड्यात टाकतो. त्यानंतर कावळा स्ट्रॉच्या मदतीने भरपूर पाणी पितो आणि तो निघून जातो.
तात्पर्य : जर आपण आपली युक्ती वापरली तर काहीही साध्य होऊ शकते.
'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'.
४) अशा प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना कथा तयार करायला सांगतात.
५) तसेच आंतरवर्गीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करतात.
विद्यार्थी कृती :
१) विदयार्थी लक्षपूर्वक कथा ऐकतात.
२) तसेच आवाजाची तंत्रे आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात.
३) पारंपरिक कथेमध्ये आधुनिक काळानुसार त्यामध्ये बदल करून कथाकथनामध्ये भाग घेतात.
संदर्भ साहित्य :
1) https://youtu.be/eGGUpa_P3xE
2) https://youtu.be/ED14BOgfP08?si=_FhHm41pibxHWQNN