सामाईक वाचन (Shared Reading) | वाचनसंस्कृती | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
१६) वाचनसंस्कृती
अवांतर वाचनाचे फायदे :
• वाचनामुळे ज्ञानात भर पडते. जगाची माहिती होते.
विचारशक्ती वाढते.
चांगल्या गोष्टींची प्रेरणा मिळते.
आपली प्रगती करता येते.
मोकळा वेळ सत्कारणी लागतो.
मनाला प्रसन्नता लाभते.
वाचन संस्कृती
समाजात्तील सर्व लोकांशी वागण्याची कला अवगत होते.
मनोरंजन होते.
माणसाला माणूस बनविते.
विचार करायला शिकविते.
मेंदू सक्रिय राहतो.
मनाची एकाग्रता वाढवतो.
मानसिक आरोग्य चांगले रहाते.
कल्पनाशक्ती व सृजनशीलता वाढते.
ताण कमी होतो.
झोप शांत लागते.
समानानुभूती वाढते.
बौद्धिक क्षमता वाढते.
चौकस वृत्ती वाढते.
नवीन शिकण्याची आवड निर्माण होते.
उपक्रम क्रमांक: १
उपक्रमाचे नाव : सामाईक वाचन (Shared Reading)
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक सामाईक वाचन करण्यासाठी वयानुरूप आवश्यक पुस्तकांची निवड करतात. उदा., ईसापनीतीमधील चित्रमय गोष्ट.
शिक्षक निवडलेल्या गोष्टीची चित्रे गोळा करून ठेवतात. यासाठी शालेय स्तरावर उपलब्ध असलेली. ग्रंथालयातील पुस्तके अवांतर वाचनाची पुस्तके विशेषतः चित्ररूप गोष्टींची पुस्तके निवडतात.
विविध योजनेअंतर्गत शाळेला मिळालेली चित्रमय गोष्टी माहितीची पुस्तके वापरतात.
विकसित होणारी कौशल्ये_ श्रवण, सूक्ष्म निरीक्षण, उच्चारण, आकलन व वाचनकौशल्य.
आवश्यक साहित्य : ग्रंथालयातील अवांतर वाचनाची पुस्तके, विशेषतः चित्ररूप गोष्टींची पुस्तके, मोठ्या आकाराची पुस्तके, शब्दपट्ट्या, वाक्यपट्ट्या, मासिके, साप्ताहिक, दिवाळी अंक, वर्तमानपत्रांमधील बालसाहित्य इत्यादी.
शिक्षक कृती :
१) शिक्षक स्वतः सिंह आणि उंदीर या गोष्टीचे वाचन करून दाखवितात आणि पाठोपाठ मुलांना वाचण्यास सांगतात.
२) वाचन संपल्यानंतर आशयावर आधारित तोंडी प्रश्न विचारतात.
उदा. (१) जंगलात कोण राहत होते? (२) सिंह कोठे झोपला होता?
३) शिक्षक गोष्टीतील प्रसंग, पात्र व त्याच्यातील संवाद यांवर आधारित प्रश्न विचारतात.
उदा. (१) उंदराने सिंहाला काय विनंती केली? (२) तुम्हाला या गोष्टीमधील कोणते पात्र आवडले?
४) शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवून त्यावर आधारित प्रश्न विचारतात.
उदा. (१) या चित्रात काय दिसते? (२) या चित्रामध्ये सिंह कोठे अडकला आहे?
(अशा प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारतात.)
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांसोबत वाचन करतात.
२) विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात.
उदा.
(१) सिंह, मंदिर (२) गुहेमध्ये, झाडाखाली
३) विचारलेल्या प्रश्नांची मुक्त उत्तरे देतात.
उदा.
(१) मला सोड. मी तुला संकटकाळी मदत करेन. मला खावू नकोस. मला सोडून दे. मला माफ कर. माझ्यावर दया कर. (२) सिंह, उंदीर
४) विद्यार्थी चित्रांचे निरीक्षण करून उत्तरे देतात.
उदा. (१) झाडे, प्राणी, गवत, पक्षी. (२) जाळीमध्ये (शिक्षक विद्यार्थ्यांची सर्व उत्तरे स्वीकारतात.)
संदर्भ साहित्य :
१) वाचनपेटीतील चित्रमय पुस्तके
२) National Book Trust (NBT) कडून मिळालेली पुस्तके
३) 'समग्र शिक्षा अभियान' अंतर्गत मिळालेली पुस्तके
४) 'निपुण भारत' अंतर्गत वाचन साहित्य
५) दात्यांकडून मिळालेले बालसाहित्य
६) Story Weaver-story weaver.org.in
७) Story Weaver Instagram - instagram.com/pbstoryweaver
८) Story Weaver Facebook facebook.com/phstoryweaver
९) Story Weaver Twitter - twitter.com/pbstoryweaver
10) Pratham Books prathambooks.org