उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : मी छायाचित्रणकार (Videographer) झालो!
पूर्वनियोजित कृती :
• व्हिडिओग्राफी करण्याकरिता आवश्यक तांत्रिक साहित्य उदा. मोबाईल, संगणक उपलब्ध करून घेणे.
• छायाचित्रण करण्याकरिता आवश्यक सामाजिक, सांस्कृतिक विषयांची यादी विद्यार्थ्यांना करण्यास सांगणे. उदा. सामाजिक समस्या, स्थानिक परिसराची / शहराची वैशिष्ट्यपूर्ण / महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये, सांस्कृतिक पार्श्वभूमी इ.
शिक्षक कृती :
१) उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून (Short Video) (२ ते ५ मिनिटांचा) करता येईल असा विषय निवडण्यास सांगतात.
२) Videography (छायाचित्रण) करण्याचे तांत्रिक निकष व त्याविषयीचे मार्गदर्शन करतात.
३) विदयार्थी मोबाईलद्वारे त्यांनी निवडलेल्या विषयावर चित्रीकरण करू शकतील याप्रकारे प्रत्यक्ष दिग्दर्शन करतात.
४) छायाचित्रण पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओचे पुढील कामकाज उदा. Editing, voice over कसा दयायचा, त्याकरिताची उपलब्ध मोफत अॅप्स यांविषयी प्रत्यक्ष दिग्दर्शनाद्वारे माहिती देतात.
५) सदर उपक्रममकरिता विद्यार्थ्यांना गटनिहाय कामकाज करण्यास सांगतात.
विद्यार्थी कृती :
शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडलेल्या विषयावर आवश्यक खबरदारी घेऊन २ ते ५ मिनिटांकरिताचे छायाचित्रण करतात.
प्रत्यक्ष शिक्षक व सहाध्यायी यांच्या मदतीने छायाचित्रण पूर्ण करतात. आनंददायी शनिवारी निर्मिती करण्यात आलेल्या व्हिडिओचे गटनिहाय प्रत्यक्ष सादरीकरण करतात.