राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या संगीत नाट्यपरंपरेत भर पडावी या उद्देशाने 14 ऑक्टोबर 1915 रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारलं. त्या काळात हे नाट्यगृह भारतातील सर्वात मोठं नाट्यगृह म्हणून ओळखलं जायचं.
मात्र कोल्हापूरच्या कलापरंपरेत मोलाचं योगदान देणाऱ्या या वास्तूला गुरुवार दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री आग लागली. संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं.. राजांनी बांधून दिलेला राजाश्रय ढासळून आगीत जळून खाक झाला. कलाकारांचं हक्काचं संगीत व्यासपीठ उध्वस्त झालं. आता पुढे काय हा प्रश्न नक्कीच कलाकारांना पडणार आहे.. कलाकारांचे अश्रू अनावर झाले. कारण त्यांच्यासाठी त्यांचं स्वतःचं घर होतं ते..
पुन्हा हे व्यासपीठ लवकरात लवकर तयार होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना..