सातवी - पुनर्रचित सेतू अभ्यास
BRIDGE COURSE
सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र
हा सेतू अभ्यास सोडवताना काही कृतींमध्ये अडचणी आल्यास न समजलेला
किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या.
सदरील सेतू अभ्यास आपल्याला दिवसानुसार सहजरित्या उपलब्ध व्हावा म्हणून
समाविष्ट केलेला आहे.
प्रत्येक दिवसाचा अभ्यास सराव करा.
घटकाचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|
पूर्व चाचणी | |
दिवस पहिला | |
दिवस दुसरा | इथे क्लिक करा |
दिवस तिसरा | इथे क्लिक करा |
दिवस चौथा | इथे क्लिक करा |
दिवस पाचवा | इथे क्लिक करा |
दिवस सहावा | इथे क्लिक करा |
दिवस सातवा | इथे क्लिक करा |
दिवस आठवा | इथे क्लिक करा |
दिवस नववा | इथे क्लिक करा |
दिवस दहावा | इथे क्लिक करा |
दिवस अकरा | इथे क्लिक करा |
दिवस बारा | इथे क्लिक करा |
दिवस तेरा | इथे क्लिक करा |
दिवस चौदा | इथे क्लिक करा |
दिवस पंधरा | इथे क्लिक करा |
दिवस सोळा | इथे क्लिक करा |
दिवस सतरा | इथे क्लिक करा |
दिवस अठरा | इथे क्लिक करा |
दिवस एकोणीस | इथे क्लिक करा |
दिवस वीस | इथे क्लिक करा |
दिवस एकवीस | इथे क्लिक करा |
दिवस बावीस | इथे क्लिक करा |
दिवस तेवीस | इथे क्लिक करा |
दिवस चोवीस | इथे क्लिक करा |
दिवस पंचवीस | इथे क्लिक करा |
दिवस सव्वीस | इथे क्लिक करा |
दिवस सत्तावीस | इथे क्लिक करा |
दिवस अठ्ठावीस | इथे क्लिक करा |
दिवस एकोणतीस | इथे क्लिक करा |
दिवस तीस | इथे क्लिक करा |
उत्तर चाचणी | इथे क्लिक करा |
कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांमध्ये नियमित शाळा होऊ शकल्या नाही. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा ऱ्हास झालेला आहे. हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण 2019 नुसार भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयात राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी कमी दिसून येत आहे. या या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता निहाय आणि विषय निहाय समता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. राज्यस्तरावरून शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमांतून सुरू राहावे याकरिता विविध उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यस्तरावर विकसित केलेल्या 45 दिवसाच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आली होती. सेतु अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतु अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळाले आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्ता निहाय आणि विषय निहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे राज्य स्तरावरून शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये देखील सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतु अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाचे स्वरूप
1) इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
2) सदर अभ्यास इयत्ता निहाय व विषय निहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.
3) पुनर्रचित सेतू अभ्यास हा तीस दिवसाचा असून यामध्ये दिवस निहाय कृतीपत्रिका देण्यात आल्या आहेत तसेच सदर अभ्यास मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यमांसाठी तयार करण्यात आला आहे.
4) सदर पुनर्रचित अभ्यासाच्या अंमलबजावणी विषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.
5) सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थी केंद्रित, कृती केंद्रित तसेच अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे. तसेच अधिक समृद्धतेकरिता साहित्याच्या लिंक्स देखील देण्यात आलेल्या आहेत.
6) सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवस निहाय सोडवतील या प्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.
7) पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी यामध्ये समावेश करण्यात आलेल्या असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्वचाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उत्तर चाचणी दिनांक 23 जुलै किंवा दिनांक 6 ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी -
पूर्व चाचणी ही राज्यातील शाळांसाठी 17 किंवा 18 जून 2022 तर विदर्भातील शाळांसाठी 1 किंवा 2 जुलै 2022 रोजी घेण्यात यावी.
30 दिवसांत सेतू अभ्यास दिनांक 20 जून ते 23 जुलै 2022 पर्यंत राहील तर विदर्भातील शाळांसाठी 4 जुलै ते 6 ऑगस्ट 2022 पर्यंत राहील.
उत्तर चाचणी सोडवण्यासाठी 25 जुलै ते 26 जुलै 2022 उत्तर विदर्भासाठी 8 ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत उत्तर चाचणी सोडून घ्यायची आहे.
पुनर्रचित सेतु अभ्यासाची अंमलबजावणी-
सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेची मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतु अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.
मागील इयत्तांच्या महत्त्वांच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या तीस दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.
सदर कृतीपत्रिका शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला जोडून द्याव्यात.
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसांची कृतिपत्रिका सोडवणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.
सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.
सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात यावी.
Disclaimer : प्रस्तुत सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे सर्वाधिकार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांचे आहेत. सदर सेतू अभ्यास शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण सुलभरित्या देता यावे म्हणून एकत्रित केलेला असून सुलभरित्या उपलब्ध करून दिलेला आहे. यात आमचा दुसरा कोणताही हेतू नाही.